Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs WI: पाकिस्तानच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियालाही बसला फटका, भारत कितव्या स्थानी?

Pakistan Beat West Indies WTC points table India position: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ८ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणकतालिकेतही मोठा उलटफेर झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 01:32 PM
PAK vs WI: पाकिस्तानच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत उलथापालथ; टीम इंडियालाही बसला फटका, भारत कितव्या स्थानी?
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठा उलटफेर
  • टीम इंडियालाही बसला फटका
  • भारत कितव्या स्थानी?
पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात पाकिस्तानसमोर चौथ्या डावात विजयासाठी फक्त ७५ धावांचे लक्ष्य होते. जे त्यांनी दोन विकेट्स गमावून पूर्ण केले. या विजयामुळे पाकिस्तानने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२५-२७ च्या गुणतालिकेत (WTC) गुणतालिकेत मोठी झेप घेतली. या विजयाचा परिणाम भारतीय संघाच्या स्थानावरही झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून, त्यात चार विजय, चार पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. अंतिम फेरीच्या शर्यतीत भारताला आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना आगामी सामन्यांमध्ये विजय नोंदवावे लागतील.

क्रिकेटविश्वात खळबळ! सुपर जायंट्समध्ये ‘कॅप्टन्सी ट्विस्ट’, Aiden Markramची अचानक एक्झिट; आता संघाची कमान ‘या’ दिग्गजाकडे

WTC गुणतालिकेत पाकिस्तान आठव्या क्रमांकावर

या सामन्यापूर्वी, पाकिस्तान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये केवळ ६ पीसीटी गुणांसह ९ व्या क्रमांकावर, म्हणजेच शेवटच्या स्थानावर होता. दुसरी कसोटी जिंकल्यानंतर, पाकिस्तान आता ८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विजयामुळे पाकिस्तानची विजयाची टक्केवारी २२.२२ पर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज या पराभवामुळे एका स्थानाने घसरून ९ व्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजची विजयाची टक्केवारी २०.८३ आहे.

भारत कितव्या स्थानी?

आठपैकी सात कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलिया ८७.५० च्या पीसीटीसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका ७५.०० च्या पीसीटीसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड ७२.२२ च्या पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशनेही चांगली कामगिरी करत ५८.३३ च्या पीसीटीसह चौथे स्थान पटकावले आहे. सध्या, टीम इंडिया ९ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ४८.१५ च्या विजयाच्या टक्केवारीसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने उडवला धु्व्वा

दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने वेस्ट इंडिजला आठ विकेट्सने पराभूत करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. चौथ्या डावात ७७ धावांचे लक्ष्य गाठताना संघाने केवळ दोन विकेट्स गमावले. अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार बाबर आझम दोघेही २४ धावांवर नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मदत केली. बाबरने जोमेल वॉरिकनच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारून सामना संपवला.

या विजयामुळे पाकिस्तानने परदेशातील सलग आठ कसोटी पराभवांची मालिका खंडित केली. दरम्यान, दुसऱ्या डावात साजिद खान आणि अली उस्मान या फिरकीपटूंच्या जोडीने उत्कृष्ट गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पाकिस्तानने २००० सालापासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील आपला अपराजित विक्रमही कायम ठेवला.

पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप

Web Title: Pakistan win over west indies 2nd test changes wtc points table india position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • PAK vs WI
  • Test Match
  • WTC 2027

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.