Paris Olympic 2024 Live Indian Badminton Player Lakshya Sen vs Malaysian Lee zii Jia : तमाम भारतीयांच्या आशास्थान राहिलेला लक्ष्य सेन अखेर कांस्यपदकाच्या निर्णायक लढतीत पराभूत झाला. लक्ष्य सेनने चांगली लढाई दिली. सामना अगदी शेवटच्या सेटपर्यंत खेचून आणला परंतु, शेवटच्या सेटमध्ये लक्ष्यने आत्मविश्वास गमावला. याचा मोठा फायदा घेत मलेशियाच्या खेळाडून चढाई करीत सामना जिंकून कांस्यपदकावर मुहूर्तमेढ रोवली.
लक्ष्यने चांगली लढाई केली, पण शेवटच्या सेटमध्ये सामना गमावला
🇮🇳🔥 𝗧𝗛𝗘 𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗢𝗙 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! From defeating Jonatan Christie to qualify for the knockouts to giving Viktor Axelsen a real scare in the semi-final, Lakshya Sen has shown the whole world exactly what he is capable of.
💪 At the age of 22, he has already achieved so… pic.twitter.com/DvRJ9ma1Nj
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 5, 2024
भारताचे स्वप्न भंगले
भारताचे बॅडमिंटनमधील ब्रान्झचे स्वप्न आज भंगले. भारताचा तडफदार तरुण खेळाडू लक्ष्य सेन याची ब्रान्झ मेडकरिता मलेशियाच्या ली झी जाबरोबर लढत होणार होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आज खेळला गेला. यामध्ये लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया यांच्यात सामना रंगला.
लक्ष्यने धमाकेदार खेळी केली, पण तिसऱ्या सेटमध्ये सामना फिरला
भारतीय तरुण तडफदार लक्ष्य सेनने टॅास जिंकत सर्व्हिस घेतली. त्याचा लक्ष्यने चांगला फायदा घेत. पहिला सेट त्याने आरामशीर जिंकला, आणि दुसऱ्या सेटमध्येसुद्धा त्याने चांगली आघाडी घेतली होती. परंतु लक्ष्य सेन त्याची आघाडी कायम ठेवू शकला नाही याचा फायदा ली झी जियाने चांगलाच फायदा घेत कमालीची कमबॅक करीत सामनाच फिरवला आणि दुसरा सेट आपल्या नावावर केला. त्यामुळे अर्थातच तिसरा सेट निर्णायक होणार होता.
लक्ष्यला आघाडी कायम ठेवता आली नाही
तिसऱ्या सेटमध्येसुद्धा लक्ष्य सेनने शानदार सुरुवात केली परंतु त्याच्या काही नॅार्मल चुकांमुळे ते सातत्य ठेवू शकला नाही, त्यामुळे झाले तसेच मलेशियाच्या ली झी जियाने याचा फायदा घेत लक्ष्य सेनवर दबाव आणला आणि सामना फिरवला शेवटी लक्ष्यवर कमालीचा दबाव वाढवत त्याने सामना खिशात टाकला.