Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympic 2024 : रेल्वे अपघातात पाय गमावला; आयआयटीमधून शिक्षण; वाचा पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नितेश कुमारची प्रेरणादायी कथा

Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar : नितेश कुमार पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. पॅरा बॅडमिंटनने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये पदार्पण केले तेव्हा प्रमोद भगतने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. नितेश कुमारने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 02, 2024 | 07:57 PM
Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar

Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar

Follow Us
Close
Follow Us:

Read an Inspiring Story of Paralympic Gold Medalist Badminton Player Nitesh Kumar : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू नितेश कुमारने चमकदार कामगिरी करीत पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नितेशने पुरुष एकेरी (SL3) गटाच्या अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा नितेश हा दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. पॅरा बॅडमिंटनने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये पदार्पण केले तेव्हा प्रमोद भगतने या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.SL3 श्रेणीतील खेळाडूंना खालच्या शरीराचे अधिक गंभीर विकार असतात आणि ते अर्ध्या-रुंदीच्या कोर्टवर खेळतात.

अद्भूत आणि रोमांचक सामन्यात नितेशचा सोनेरी विजय

#SAIDailyWrap: #ParisParalympics2024– Day 5⃣, Part 1⃣👇

Para shuttler Nitesh Kumar's #Gold🥇& Discuss thrower Yogesh Kathuniya's #Silver🥈 surely made the first half exciting😍😍

Check out the daily wrap to know what else happened so far and stay tuned for Part 2⃣ 🥳

Until… pic.twitter.com/E80tS65xOR

— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024

नितेशचा प्रवास सोपा नव्हता…
नितेश कुमार यांचा जन्म 30 डिसेंबर 1994 रोजी राजस्थानच्या बस कीर्तन (चुरू जिल्ह्यातील राजगढ तहसील) येथे झाला.2009 मध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर नितीश कुमार याला त्यांचा डावा पाय कायमचा गमवावा लागला होता. त्यावेळी नितेश अवघे १५ वर्षांचे होते. या दुःखद घटनेनंतरही नितीश कुमार घाबरला नाही आणि त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी एक वर्षाची सुटी घेतली.

२०१३ मध्ये आयआयटी मंडीत प्रवेश

त्याची मेहनत रंगली आणि त्याला २०१३ मध्ये आयआयटी मंडीत प्रवेश मिळाला. आयआयटीमध्ये शिकत असतानाच त्याला बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण झाली आणि त्याने पॅरा-ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2017 मध्ये आयरिश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिले विजेतेपद जिंकले. त्याने 2019 मध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार विभागासाठी काम करण्यास सुरुवात केली, परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरूच ठेवले. 30 वर्षीय नितीशने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 2019, 2022 आणि 2024 मध्ये अनुक्रमे दोन रौप्य आणि एका कांस्यपदकांसह तीन पदके जिंकली आहेत.

आशियाई पॅरा गेम्समध्येही चार पदके जिंकली

29 वर्षीय नितेश कुमारने आशियाई पॅरा गेम्समध्येही चार पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 2018 जकार्ता आशियाई पॅरा गेम्समधील एक कांस्य पदक आणि 2022 हांगझो आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन पदके (एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य) यांचा समावेश आहे. आणि आता सोमवारी त्याने आपल्या पदक विक्रमात पॅरालिम्पिक सुवर्णपदकाचीही भर घातली आहे.

पाहिल्यास, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जमा आहेत. नितेश कुमारच्या आधी नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते

1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)

9. नितेश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)

 

Web Title: Paris paralympic 2024 lost leg in train accident then studied at iit read an inspiring story of paralympic gold medalist badminton player nitesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 07:56 PM

Topics:  

  • gold medal
  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.