Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs MI: पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; कर्णधार श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Consecutive Defeat Record on Shreyas Iyer Name: मुंबईविरुद्ध सलग पाचवा सामना गमावल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 04:00 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
  • पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस?
  • MI VS PBKS सामन्यात काय घडले?
आयपीएल २०२६ च्या ५८व्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव आहे. या पराभवामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून २०० पेक्षा जास्त धावांचा स्कोअर डिफेंड करताना सर्वाधिक सामने गमावण्याचा नकोसा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर आहे. मुंबईविरुद्धचा पराभव हा श्रेयसचा सातवा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात, अय्यर व्यतिरिक्त इतर कोणत्याही कर्णधाराने २०० पेक्षा जास्त धावांचे स्कोअर डिफेंड करताना पाचपेक्षा जास्त सामने गमावलेले नाहीत.

LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट

श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये आतापर्यंत अशा २० सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे ज्यामध्ये २०० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या. २० पैकी १२ सामने अय्यरने जिंकले तर ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तर, PBKS पंजाब किंग्स संघाला २०० चा स्कोअर डिफेंड करताना दहाव्यांदा पराभव पत्कारावा लागला. गुरुवारी, मुंबई विरुद्ध सामना हरल्यानंतर अय्यरच्या नावे हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

पलटणने रोखले अय्यरचे विजयी रथ

कर्णधार श्रेयस अय्यरने २०२२ पासून मुंबई इंडियन्सविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता. परंतु, गुरुवारी त्याचा हा विक्रम मोडला गेला. कर्णधार म्हणून अय्यरने MI एमआयविरुद्ध सात सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे, त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवताना पंजाब किंग्सविरुद्ध आठ सामने जिंकले आहेत.

पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस?

सलग पाचव्या पराभवामुळे श्रेयस खूप निराश दिसत होता. या सामन्यातील पराभव पचवणे खूप कठीण असल्याचे त्याने कबूल केले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये श्रेयस म्हणाला की, ‘अर्थातच हा पराभव पचवणे खूप कठीण आहे, पण मला इथे कोणावरही पराभवाचे खापर फोडायचे नाही कारण पंजाब किंग्सने या सामन्यात शानदार झुंज दिली. हा एक उत्तम क्रिकेट सामना होता. तसेच, तिलकने शानदार खेळी केली. त्याचे शॉट्स सिलेक्शन चांगले होते. तिलकने फिल्डला चांगले समजले, म्हणून त्याचे श्रेय मिळायला हवे.’

MI VS PBKS सामन्यात काय घडले?

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० ओव्हरमध्ये आठ विकेट्स गमावून २०० धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने ३२ चेंडूंमध्ये ५७ धावांची दमदार खेळी केली. तर, अझमतुल्लाने १७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने १९.५ ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून २०१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने ३३ चेंडूंमध्ये ७५ धावांची दमदार खेळी करत शानदार फलंदाजी केली, तर रायन रिकल्टनने २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. तिलकने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. दरम्यान, विल जॅक्स १० चेंडूंमध्ये २५ धावांवर नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला.

‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

Web Title: Pbks vs mi shreyas iyer unwanted record punjab kings fifth defeat ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • mumbai indians
  • Punjab Kings
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

घोळात घोळ! Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’; पलटणने बिघडवले Play OFF चे समीकरण
1

घोळात घोळ! Punjab Kings चा पराभवाचा ‘पंच’; पलटणने बिघडवले Play OFF चे समीकरण

IPL 2026: अंपायरला शिवीगाळ करणं पडलं महागात, बॅटिंग कोच Kieron Pollard ला भरभक्कम दंड
2

IPL 2026: अंपायरला शिवीगाळ करणं पडलं महागात, बॅटिंग कोच Kieron Pollard ला भरभक्कम दंड

हे काय घडलं! हार्दिक – सूर्या गायब, चक्क Jasprit Bumrah च्या खांद्यावर MI ची जबाबदारी
3

हे काय घडलं! हार्दिक – सूर्या गायब, चक्क Jasprit Bumrah च्या खांद्यावर MI ची जबाबदारी

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
4

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.