Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप

Pakistan: लॉर्ड्स कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी संघात समाविष्ट असलेल्या ७ खेळाडूंना तात्काळ पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 03:35 PM
Pakistan Cricket Board

Pakistan Cricket Board

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे स्वच्छता अभियान
  • इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध जिंकली सिरिज
  • पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत दारुण पराभव 

Pakistan Cricket Board:
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दोन कसोटी सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना शिल्लक असतानाच पीसीबीने संघात आणि व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर ‘सफाई मोहीम’ सुरू केली आहे.

लॉर्ड्स कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर पीसीबीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी संघात समाविष्ट असलेल्या ७ खेळाडूंना तात्काळ पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, संघाचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि सहाय्यक प्रशिक्षक उमर गुल यांनाही तातडीने मायदेशी बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात खळबळ उडाली आहे.

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…

सिरिजमधील पहिल्या दोन सामन्यांतील अत्यंत सुमार कामगिरीमुळे पाकिस्तानात माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पीसीबीने सुरू केलेल्या या धडक कारवाईत आता निवड समितीचे अध्यक्ष आकिब जावेद यांचीही उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संघ निवडीतील चुका आणि खेळाडूंचे अपयश यामुळे आकिब जावेद यांच्यावर मोठा दबाव वाढला आहे.

लॉर्ड्स कसोटीदरम्यान इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदानातून बाहेर पडला होता. मात्र, तो खरोखरच दुखापतग्रस्त आहे की संघातून काढता पाय घेण्यासाठी त्याने दुखापतीचे बनावट नाटक रचले, असा गंभीर आरोप आता त्याच्यावर होत आहे. क्रीडा वर्तुळात आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून इमामच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीसीबी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. आरोप सिद्ध झाल्यास इमाम-उल-हकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेटकिपर अन् फलंदाज मोहम्मद रिझवान याला अचानक मायदेशी बोलावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

मालिकेचा शेवटचा सामना अजून बाकी असतानाच मुख्य प्रशिक्षकासह मुख्य खेळाडूंना अशा प्रकारे अर्ध्यावरून परत बोलावल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटच्या नियोजनावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिसऱ्या कसोटीत उर्वरित खेळाडू आणि नव्याने नियुक्त केलेल्या तात्पुरत्या व्यवस्थापनासह पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे.

Web Title: Pcb started clean up campaign chief of selector aqib javed and 7 players dismissed before england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Pakistan cricket
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan vs England

संबंधित बातम्या

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…
1

Eng Vs PakL: त्यांचं रक्तचं घाणेरडं! ‘या’ खेळाडूचे दुखापतीचे ‘ढोंग’? तर रिझवानचा ‘द एंड’, PCB थेट…

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी
2

ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी

ENG Vs PAK: क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानचा खेळखंडोबा; ‘या’ खेळाडूचा राजीनामा, PCB चा निर्णय अंगलट?
3

ENG Vs PAK: क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानचा खेळखंडोबा; ‘या’ खेळाडूचा राजीनामा, PCB चा निर्णय अंगलट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.