एका क्लिकवर पहा IPL 2026 चे पॉईंट्स टेबल (फोटो- ai gemini)
आयपीएल 2026 मध्ये पार पडले 4 सामने
पंजाब विरुद्ध गुजरात मॅचनंतर गुणतालिकेत बदल
आज दिल्ली लखनौविरुद्ध भिडणार
IPL 2026 Points Table/Orange & Purple Cap Live Updates: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. कालपर्यंत चार सामने पार पडले आहेत. दरम्यान पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये (IPL) मोठे बदल झाले आहेत. तर आज आपण पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले आहेत आणि ऑरेंज व पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहे ते जाणून घेऊयात.
आयपीएल सुरू झाल्यावर आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. काल पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. हातातील सामना गुजरात टायटन्सने गमावला. त्यांतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत अनेक खेळाडू समोर आले आहेत.

IPL 2026 Points Table (Image – aigemini)
ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोण?
| क्रमांक | खेळाडूचे नाव | संघ | सामने | एकूण धावा | सर्वोच्च धावसंख्या |
|---|---|---|---|---|---|
| 1 | रायन रिकलटन | मुंबई इंडियन्स (MI) | 1 | 81 | 81 |
| 2 | ईशान किशन | सनरायझर्स हैदराबाद (SRH) | 1 | 80 | 80 |
| 3 | रोहित शर्मा | मुंबई इंडियन्स (MI) | 1 | 78 | 78 |
| 4 | कूपर कॉनोली | पंजाब किंग्स (PBKS) | 1 | 72* | 72* |
| 5 | विराट कोहली | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) |
1 |
सर्वाधिक विकेट घेऊन सध्या गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णा आहे. त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर जेकब डफी आहे. त्याने देखील 3 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय शार्दुल ठाकूर, शेफर्ड यांनी देखील 3 विकेट्स पटकावल्या आहेत.
DC vs LSG Playing 11: आज दोस्तीत कुस्ती! पंत-पटेल भिडणार; ‘हे’ 11 खेळाडू गाजवणार मैदान
आज दिल्ली विरुद्ध लखनौ भिडणार
आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. दरम्यान आज सर्वांच्या नजरा ऋषभ पंतच्या कामगिरीकडे असणार आहे.
LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी
एलएसजी संभाव्य टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी






