Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले ‘रौप्य’ पदक

हाय जंप प्रकारात सर्वेशने सुरुवातीपासून आपले वर्चस्व ठेवले होते. 2.05 मीटर, 2.10 मीटर आणि 2.15 व 2.20 मीटर प्रकारात पहिल्याच उडीमध्ये यश प्राप्त केले. त्यानंतर त्याने 2.25 मीटरच्या प्रकारात तिसऱ्या उडीमध्ये यश मिळवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 03:55 PM
Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले 'रौप्य' पदक

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले 'रौप्य' पदक

Follow Us
Follow Us:
  • उंच उडी प्रकारात सर्वेश कुशारेने जिंकले रौप्य पदक
  • ग्लासगो येथे सुरू आहे कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केले सर्वेशचे अभिनंदन
स्पोर्ट्स न्यूज डेस्क: सध्या स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताने आपल्या पदकांचे खाते उघडले आहे. भारताचा खेळाडू ॲथलीट सर्वेश अनिल कुशारे याने पुरुषांच्या हाय जंप (उंच उडी) प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या प्रकारात त्याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या हाय जंप क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकणारा सर्वेश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी सर्वेशचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या सर्वेश कुशारेने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. सर्वेश कुशारेने तब्बल 2.25 मीटर हाय जंप मारत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. पुरुषांच्या हाय जंपच्या अंतिम फेरीत सर्वेशने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते,  या ऐतिहासिक कामगिरीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोशल मिडियावर पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

हाय जंप प्रकारात सर्वेशने सुरुवातीपासून आपले वर्चस्व ठेवले होते. 2.05 मीटर, 2.10 मीटर आणि 2.15 व 2.20 मीटर प्रकारात पहिल्याच उडीमध्ये यश प्राप्त केले. त्यानंतर त्याने 2.25 मीटरच्या प्रकारात तिसऱ्या उडीमध्ये यश मिळवले आणि रौप्य पदक आपल्या नावावर केले. यानंतर २.२८ मीटरच्या उंचीसाठी सर्वेश आणि जमैकाच्या रोमेन बेकफोर्डमध्ये लढाई झाली. मात्र दोघांना हा टप्पा पूर्ण करता आला नाही. मात्र, २.२५ मीटरची उडी पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केल्यामुळे जमैकाच्या रोमेन बेकफोर्डला सुवर्णपदक मिळाले, तर सर्वेशला कौंटबॅक नियमानुसार रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जॅक किमानीने २.२० मीटरसह कांस्य पदक पटकावले.

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु?

सर्वेश कुशारेचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्याची ही जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरी देशातील लाखो तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल.

Hearty congratulations to Sarvesh Anil Kushare for clinching the Silver Medal in the Men’s High Jump event at the Glasgow Commonwealth Games 2026. With your excellent performance, you have made India proud. My best wishes to you for many more inspiring feats. — President of India (@rashtrapatibhvn) July 28, 2026

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने ग्लास्गो CWG 2026 मध्ये हाय जंपमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. शेतकरी कुटुंबातील या तरुणाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातर्फे त्याचे मनःपूर्वक अभिनंदन

🥇🥈🇮🇳 Heartiest congratulations to Sharmila Dhankar on becoming India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics by winning the Women’s Shot Put F57 and to Sarvesh Kushare on winning the Silver Medal in the Men’s High Jump at the Commonwealth Games.… pic.twitter.com/k6csSZHQJ0 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2026

 

Web Title: President murmu cm fadnavis congratulations to sarvesh kushare win silver medal high jump in commonwealth games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • commonwealth games 2026
  • Draupadi Murmu

संबंधित बातम्या

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठाम – मुख्यमंत्री फडणवीस
1

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ठाम – मुख्यमंत्री फडणवीस

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय
2

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय

वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक
3

वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक

Commonwealth Games 2026: मजूर ते पदक विजेता! 200 रुपयांसाठी काम करणारा ऋषिकांत सिंगने भारतासाठी आणले सिल्व्हर
4

Commonwealth Games 2026: मजूर ते पदक विजेता! 200 रुपयांसाठी काम करणारा ऋषिकांत सिंगने भारतासाठी आणले सिल्व्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.