Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Prithvi Shaw to lead Maharashtra in Ranji Trophy opener: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने पृथ्वी शॉवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. पृथ्वीची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 02:57 PM
Prithvi Shaw to lead Maharashtra in Ranji Trophy

Prithvi Shaw to lead Maharashtra in Ranji Trophy

Follow Us
Follow Us:
  • पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्राची कमान
  • ऋतुराजच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी
  • रणजीत दाखवणार दम
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. अलीकडेच पृथ्वी आणि त्याची होणारी बायको आकृतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, पृथ्वी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्या सामन्यासाठी पृथ्वी शॉला ऋतुराज गायकवाडच्या जागी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र संघ ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत सर्व्हिसेसविरुद्ध गट ‘क’ मधील सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

पृथ्वी शॉची कर्णधारपदी नियुक्ती

नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडचा महाराष्ट्राच्या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करेल. भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील हे सामने ६, ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी पुदुचेरी येथे खेळले जातील. रणजी करंडक २०२६-२७ हंगाम देखील ११ ऑक्टोबर रोजी सुरू होईल. अशा परिस्थितीत, गायकवाडच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. या मालिकेसाठी महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू अर्शिन कुलकर्णीचाही भारत ‘अ’ संघात संधी देण्यात आली आहे.

२०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी शॉ महाराष्ट्रात सामील होण्यासाठी मुंबई संघाला निरोप दिला होता. त्या हंगामात त्याने महाराष्ट्रासाठी उत्कृष्ट कामगिरी केली, सात सामन्यांतील ११ डावांमध्ये ५३७ धावा करून आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्याने महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा देखील केल्या.त्याने भारतासाठी पाच कसोटी सामने खेळले असून, त्यात ३३९ धावा केल्या आहेत. त्याने ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९ धावा देखील केल्या आहेत. तो शेवटचा २०२१ मध्ये भारतासाठी खेळला. त्यानंतर त्याचा भारतीय संघात संधी मिळाली नाही.

कर्णधारपदाचा उत्कृष्ट अनुभव

पृथ्वी शॉची तुलना एकेकाळी सचिन तेंडुलकरशी केली जात होती. पृथ्वीची कर्णधार म्हणून रेड बॉल आणि व्हाईट बॉल क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे. तो एक उत्कृष्ट कर्णधार राहिला आहे. २०१८ मध्ये, शॉने भारतीय १९ वर्षांखालील संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिल देखील या संघाचा भाग होता आणि तो शॉच्या कर्णधारपदाखाली खेळला.

त्यानंतर पृथ्वीने २०२१-२२ च्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. मात्र, संघाला मध्य प्रदेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शॉने मुंबईला विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली होती, त्याने ८२७ धावा केल्या, ज्यात २२७ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. आता तो पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाची कमान हाती घेणार आहे.

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Web Title: Prithvi shaw maharashtra captain ranji trophy ruturaj gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Prithvi Shaw
  • ranji trophy 2026

संबंधित बातम्या

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
1

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
2

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात
3

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
4

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.