IND vs WI 1st T20 Schedule
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल.
पाच सामन्यांची टी२० मालिकेतील पहिला सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स टीव्हीवर विविध भाषांमध्ये या सामन्याचा थेट आनंद घेऊ शकतात. याशिवाय, या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तुम्ही जिओहॉटस्टार ॲप वापरून तुमच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांवर सामना पाहू शकता.
पहिला टी२० सामना – ६ ऑक्टोबर , एकाना स्टेडियम, लखनौ
दुसरा टी२० सामना – ९ ऑक्टोबर, जेएससीए स्टेडियम, रांची
तिसरा टी२० सामना – ११ ऑक्टोबर, होळकर स्टेडियम, इंदूर
चौथा टी२० सामना – १४ ऑक्टोबर, राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद
पाचवा टी२० सामना – १७ ऑक्टोबर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने २० सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने १० सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला.






