
table tennis competition
प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर येथील टेबल टेनिस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात उप उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित अद्वैय हुद्दर याने पुष्कर चक्रदेवचा १२-१०, ११-६, १२-१० असा सहज पराभव केला. सहाव्या मानांकित स्वरूप भाडळकर याने रयान लेलेचा ११-३, ११-७, १२-१० असा तर, पाचव्या मानांकित निशाद लेले याने विहान घाटकरचा ११-७, ११-९, ११-७ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत विदिता घाटकरवर ११-८, ११-९, ११-६ असा विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धनने अन्विता देशपांडेला ११-९, ९-११, ११-१, ११-७ असे नमविले. सहाव्या मानांकित आहाना गोडबोलेने स्पृहा बोरगावकर वर ११-३, ११-८, ११-३ असा विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन उसगावकर, सिम्बॉयसिसच्या वित्तीय विभागाचे सुनील जैन, मुख्य पंच मधुकर लोणारे आदी उपस्थित होते.
दिया शिंदे [१] वि. वि. विदिता घाटकर ११-८, ११-९, ११-६;
डायना पटेल वि. वि. सान्वी नवांगुल ५-११, ११-४, १२-१०, ११-८;
स्पृहा गुजर [५] वि. वि. शरण्या प्रधान ६-११, ११-६, ११-६, ११-८;
अनन्या पाटील [४] वि. वि. शगुन गणेशी ११-५, ५-११, ११-९, १२-१०;
शरण्या पटवर्धन [३] वि. वि. अन्विता देशपांडे ११-९, ९-११, ११-१, ११-७;
आहाना गोडबोले [६] वि. वि. स्पृहा बोरगावकर ११-३, ११-८, ११-३;
श्रेया कोठारी वि. वि. श्रीनिका उमेकर ११-७, ८-११, ११-९, ८-११, १५-१३;
नीरजा देशमुख [२] वि. वि. सारा गांधी ११-८, ११-९, ११-७
वेदांश, रावी, शौर्य अन् इराचा दणका! पीएमडीटीए ब्राँझ सिरीज Tennis स्पर्धेत पटकावले विजेतेपद…
आर्यन वानखेडे [१] वि. वि. अंगदसिंग उप्पल ११-५, ११-८, ११-४;
साहिल भोरकर वि. वि. श्लोक प्रधान ११-४, ११-२, ११-४;
अंगद भार्गवे वि. वि. विहान घाटकर १२-१०, ११-९, ११-९;
एल्विस टॉम [८] वि. वि. पृथ्वी करडे ११-२, ११-४, ११-४;
वरदान कोलते [५] वि. वि. वरदन पवार ११-९, ११-७, ७-११, ११-७;
|साद वकील वि. वि. अद्विक शिंदे ११-६, ११-९, ११-७;
मिथिल ठक्कर वि. वि. आरव अपूर्व ११-६, ११-४, ११-८;
नभ पांचोलिया [४] वि. वि. क्षितिज अवधानी ११-७, ११-५, ११-३;