Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो धावण्यासाठी व्हा तयार! ‘या’ दिवशी रंगणार भव्य Marathon स्पर्धा, तब्बल 10 हजार…

Marathon: या ऐतिहासिक पर्वासाठी देशभरातून आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली असून केनिया, इथिओपिया, टांझानिया यांसारख्या देशांतील १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 06:25 PM
६ डिसेंबर रोजी रंगणार पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

६ डिसेंबर रोजी रंगणार पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

Follow Us
Follow Us:
  • ६ डिसेंबर रोजी रंगणार पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
  • १० हजारांहून अधिक धावपटूंची मॅरेथॉनसाठी नोंदणी
  • ‘स्वर्गीय सुरेश कलमाडी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६‘ या नावाने आयोजित केली जाणार स्पर्धा 
पुणे:/ Marathon: भारतातील सर्वात जुन्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे, अशी घोषणा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली. मॅरेथॉनचे संस्थापक स्वर्गीय सुरेश कलमाडी यांचे जानेवारी २०२६ मध्ये निधन झाले. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी यंदाची स्पर्धा ‘स्वर्गीय सुरेश कलमाडी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६’ या नावाने आयोजित केली जाईल.

या ऐतिहासिक पर्वासाठी देशभरातून आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली असून केनिया, इथिओपिया, टांझानिया यांसारख्या देशांतील १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२६ असून www.marathonpune.com या संकेतस्थळावर नोंदणी सुरू आहे.

Thane Marathon : ठाण्यात 1 नोव्हेंबरला ‘यंग इंडिया’ राज्यस्तरीय मॅरेथॉन

पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि संचालक मंडळ

यंदाच्या पर्वासाठी ‘पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा’ हा सामाजिक संदेश निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेचे संचालक म्हणून सुमंत वायकर, तांत्रिक संचालक म्हणून वसंत गोखले आणि संयुक्त संचालक म्हणून गुरबाज कौर व रोहन मोरे जबाबदारी सांभाळत आहेत. वैद्यकीय समितीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉ. राजेंद्र जगताप यांचा वारसा पुढे नेण्यासाठी डॉ. युवराज जगताप, डॉ. शिवशरण आणि डॉ. प्रियांक जवळे वैद्यकीय सेवांचे समन्वय करणार आहेत.

 स्पर्धेची वेळ आणि ठिकाण

सर्व स्पर्धांचा प्रारंभ सारसबागेजवळील बाबूराव सणस क्रीडांगण येथून होईल. त्यामध्ये पूर्ण मॅरेथॉन (४२.१९५ किमी): पहाटे ३.०० वा, अर्धमॅरेथॉन (२१.०९७५ किमी): पहाटे ३.३० वा, १० किमी: सकाळी ६.३० वा, ५ किमी: सकाळी ७.३० वा, ३.५ किमी: सकाळी ७.४५ वा सुरू होईल.धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी मार्गात काही किरकोळ बदल करण्यात आले असून सुधारित मार्ग नोव्हेंबरच्या मध्यावर जाहीर होईल. तसेच पूर्ण व अर्धमॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना विशेष फिनिशर पदके दिली जातील. बिसलेरी (हायड्रेशन), पोकारि स्वेट (इलेक्ट्रोलाइट) आणि सुहाना ग्रुप (नाश्ता) यांचे सहकार्य लाभणार असून विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहतील. पुण्याच्या क्रीडा परंपरेचा हा ४० वा उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केले आहे.

Delhi Half Marathon : दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचा डंका! माताताने मोडला कोर्स रेकॉर्ड, महिलांमध्ये एलेमू अव्वल

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन कधी होणार?

    Ans: पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन , ६ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे,

  • Que: देशभरातून आतापर्यंत धावपटूंनी नोंदणी केली आहे?

    Ans: आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे.

Web Title: Pune international marathon 6 december 2026 suresh kalmadi 10 thousand registration tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Marathon
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने
1

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Thane Marathon : ठाण्यात 1 नोव्हेंबरला ‘यंग इंडिया’ राज्यस्तरीय मॅरेथॉन 
3

Thane Marathon : ठाण्यात 1 नोव्हेंबरला ‘यंग इंडिया’ राज्यस्तरीय मॅरेथॉन 

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले
4

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.