
टेबल टेनिस स्पर्धा
एआयटीए, एमएसएलटीए आणि पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित ओजस पवारने अर्णव देवीचा ६-१, ६-१ असा पराभव केला. सर्वेश मोहितेने भावित धायलवर ६-३, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली.बिगरमानांकित प्रयाण ढगेने चौथ्या मानांकित वीर पधारियाचे आव्हान ६-३, ६-२ असे मोडीत काढत मुख्य फेरी गाठली. नवव्या मानांकित आरुष दिवेकरने पाचव्या मानांकित तनुष सोपलचा ६-३, ६-४ असा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित ईशिता पाटीलने हिरण्या दिवाणचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. अविका दाणीने दुसऱ्या मानांकित आर्या कसबेवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला. रीत नवलने तिसऱ्या मानांकित काव्या मालेगावकरचा ६-३, ६-३ असा पराभव करून मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील खेळाडूंची मानांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या श्रेयस चौतमहलला, तर मुलींच्या गटात ईशिता पाटीलला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
मुलांची मानांकन यादी
१. श्रेयस चौतमहल (महाराष्ट्र)
२. अव्यान घुमरे (महाराष्ट्र)
३. कबीर पंचमतिया (महाराष्ट्र)
४. कियान पेंडुरकर (महाराष्ट्र)
५. रिदित नवले (महाराष्ट्र)
६. विहान देवधरे (महाराष्ट्र)
७. अर्थ सानप (महाराष्ट्र)
८. देवांश चव्हाण (महाराष्ट्र)
Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय
मुलींची मानांकन यादी
१. ईशिता पाटील (महाराष्ट्र)
२. समायरा चौधरी (महाराष्ट्र)
३. कनिष्का नारुका (महाराष्ट्र)
४. आराध्या पवार (महाराष्ट्र)
५. काव्या हलदुले (महाराष्ट्र)
६. कायरा गोहिल (महाराष्ट्र)
७. आर्या कुलकर्णी (महाराष्ट्र)
८. वेदिका भोईटे (महाराष्ट्र)