नाडगोंडे रेव्हन्सला पीवायसी बॅडमिंटनचे विजेतेपद
ऑयानंतर खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात टायगर्सच्या मिहिर विंझे व प्रीती सप्रे यांनी रेव्हन्सच्या मनीष शहा व प्रांजली नाडगोंडे यांचा १५-०३, १५-०७ असा पराभव करत सामना बरोबरीत आणला. प्रौढ दुहेरीच्या चौथ्या सामन्यात अमोद प्रधान व आनंद घाटे यांनी अविनाश दोशी व समीर सावला यांचा १६-१४, १७-१५ असा पराभव करत टायगर्सला आघाडी मिळवून दिली.
Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच
प्रौढ दुहेरीच्या पाचव्या सामन्यात रेव्हन्सच्या चंद्रशेखर आपटे व विश्वास मोकाशी यांनी बाळ कुलकर्णी व परीक्षित देवल यांचा २०-१८, १५-०९ असा पराभव करत रेव्हन्सला पुन्हा बरोबरी साधून दिली. त्यानंतर खुल्या दुहेरीच्या सहाव्या सामन्यात टायगर्सच्या कर्णा मेहता व यश मेहेंदळे यांनी रेव्हन्सच्या आशय कश्यप व विनित राठी यांचा ११-१५, १६-१४, १५-१३ असा पराभव करत टायगर्सला पुन्हा आघाडी मिळवून दिली.खुल्या दुहेरीच्या सातव्या सामन्यात रेव्हन्सच्या चिन्मय चिरपुटकर व पृथ्वी शहा यांनी अभिषेक ताम्हाणे व तनिश बेलगलकर यांचा १५-१२, १५-०८ असा पराभव करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. त्यामुळे अंतिम सामन्याचा निकाल मिश्र दुहेरीच्या सामन्यावर अवलंबून राहिला.
मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रेव्हन्सच्या रिआन करंदीकर व सारा नवरे यांनी तन्मय चोभे व नेहा लागू यांचा १५-०७, १२-१५, १५-१० असा पराभव केला. या विजयासह रेव्हन्सने अंतिम सामना ४-३ असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.विजेत्या नाडगोंडे रेव्हन्स संघाला करंडक व पदके देऊन गौरविण्यात आले. पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, अमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी
सर्वोत्कृष्ट जोडी (गोल्ड दुहेरी) : केदार नाडगोंडे/प्रतीक धर्माधिकारी
सर्वोत्कृष्ट जोडी (सिल्वर दुहेरी) : कर्णा मेहता/यश मेहेंदळे
सर्वोत्कृष्ट जोडी (ब्राँझ दुहेरी) : अभिषेक ताम्हाणे/तनिश बेलगलकर
सर्वोत्कृष्ट जोडी (प्रौढ दुहेरी) : मकरंद चितळे/अनिल देडगे
सर्वोत्कृष्ट जोडी (मिश्र दुहेरी) : रिआन करंदीकर/सारा नवरे
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (पुरुष) : प्रतीक धर्माधिकारी/कर्णा मेहता
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (महिला) : सारा नवरे
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (प्रौढ) : सिद्धार्थ साठे/हेमंत करमरकर
उदयोन्मुख खेळाडू : अन्वित राजवाडे
मॅच ऑफ द टूर्नामेंट : ईशान लागू/निखिल चितळे वि. अनिश राणे/कृष्णनिल गोरे






