शरण्या राज्य मानांकन स्पर्धेचे विजेते
राजवर्धन हा बार्शी येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, बार्शी टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक गणेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.अकरा वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत पुण्याच्या शरण्या पटवर्धन हिने ठाण्याच्या कियारा लेले हिच्यावर ११-४, ११-७, १३-११ असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत विजेतेपद पटकावले. शरण्याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कियाराला फारशी संधी दिली नाही. शरण्या एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून, मार्तंड बिनीवाले टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक मार्तंड बिनीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
अकरा वर्षांखालील मुले
· अधिराज चौहान (ठाणे) वि.वि. आरव बापट (पुणे) — ११-२, ११-६, ११-१
· अथर्व वैजवाडे (परभणी) वि.वि. ओजस ऐनापुरे (सोलापूर) — ११-४, ११-२, ११-३
· निर्मित कुटे (ठाणे) वि.वि. शिव बहल (ठाणे) — ११-५, ११-६, ७-११, ८-११, १३-११
· राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. रणवीर जाधव (कोल्हापूर) — ११-२, ११-५, ११-४
उपांत्य फेरी :
· अधिराज चौहान (ठाणे) वि.वि. अथर्व वैजवाडे (परभणी) — ११-७, ११-५, ११-८
· राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. निर्मित कुटे (ठाणे) — ११-४, ११-४, ११-३
अंतिम फेरी :
· राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. अधिराज चौहान (ठाणे) — ११-१३, ११-६, ५-११, ११-९, ११-२
अकरा वर्षांखालील मुलींचा गट उपांत्यपूर्व फेरी
· अधीरा आहेर (नाशिक) वि.वि. इशिता भानगडीया (ठाणे) — १२-१०, ११-५, ११-७
· कियारा लेले (ठाणे) वि.वि. अनया आहेर (नाशिक) — ११-४, ११-८, ११-४
· रिद्धी सिंग (ठाणे) वि.वि. आरोही श्रीश्रीमळ (कोल्हापूर) — ११-७, ११-५, ११-५
· शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. धडकन टन्ना (ठाणे) — ५-११, ११-९, ११-१३, १२-१०, ११-७
उपांत्य फेरी :
· कियारा लेले (ठाणे) वि.वि. अधीरा आहेर (नाशिक) — १२-१०, ७-११, ९-११, ११-६, ११-३
· शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. रिद्धी सिंग (ठाणे) — ११-५, ११-५, ७-११, ११-१३, ११-९
अंतिम फेरी :
· शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. कियारा लेले (ठाणे) — ११-४, ११-७, १३-११
या विजयामुळे राजवर्धन तिवारी आणि शरण्या पटवर्धन यांनी राज्य मानांकन स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या अकरा वर्षांखालील गटातील विजेतेपदावर आपले नाव कोरले.






