Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो निवृत्त झाला असता…’ धोनीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवल्याने अश्विन संतापला! IPL 2026 आधी फिरकीपट्टूचे मोठे विधान

धोनी या हंगामात यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसनकडे सोपवेल का? धोनी या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल का? या प्रश्नावर आता भारताचा माजी फिरकीपट्टू आर अश्विनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 27, 2026 | 09:38 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया/युट्यूब

फोटो सौजन्य - सोशल मिडिया/युट्यूब

Follow Us
Follow Us:

आयपीएल सुरू व्हायला काही तास शिल्लक आहेत, सोशल मिडियावर आयपीएल 2026 ची दमदार सुरूवात होणार आहे. सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच धोनी पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. आता हा एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल का? धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल? धोनी या हंगामात यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसनकडे सोपवेल का? धोनी या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल का? आयपीएल २०२६ च्या आधी धोनीबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 

धोनी आता ४४ वर्षांचा आहे आणि ७ जुलै रोजी तो ४५ वर्षांचा होईल. त्यामुळे, हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो, असा अंदाज लावणे चुकीचे ठरणार नाही. दरम्यान, सीएसके संघ बदलाच्या काळातून जात आहे. संजू सॅमसन संघात सामील झाल्यामुळे, माही आपली जबाबदारी त्याच्याकडे सोपवू शकतो. इतर सर्व प्रश्नांची उत्तरे चाहते अंदाज लावू शकतात, परंतु धोनी या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल की नाही हे सांगणे कठीण आहे. 

पाकिस्तान पुन्हा एकदा इज्जत घालवली! PSL सामन्यादरम्यान चेंडूचा रंग अचानक बदलला? पाक पुन्हा एकदा ठरला उपहासाचा धनी

तथापि, माजी फिरकी गोलंदाज आर अश्विन याच्या बाजूने नाही. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “तो ‘इम्पॅक्ट लिस्ट’मध्ये राहावा हे मला मान्य नाही. जर तो संघात असेल, तर त्याला खेळावेच लागेल. जर त्याला खेळायचे नसेल, तर त्याने संपूर्ण हंगाम खेळू नये, विषय संपला. तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ आहे हे मला मान्य नाही.”

ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही सीएसकेचा प्लेइंग इलेव्हन बनवत असाल आणि त्यात धोनी असेल, तर चर्चा तिथेच संपते. तो संघात असायलाच हवा. जर त्याला खेळायचे नसते, तर तो निवृत्त झाला असता. तो खेळू शकतो याचा त्याला १००% विश्वास आहे. तो गेल्या तीन महिन्यांपासून सराव करत आहे. ‘मला खेळायचे आहे, तुम्हाला जे वाटेल ते विचार करा’ हा त्याचा संदेश आहे. जर त्याला खेळायचे असेल, तर त्याच्याकडे जाऊन ‘तू खेळू शकत नाहीस’ असे सांगणे शक्य नाही. मी मान्य करतो की तो तुमचा सहाव्या क्रमांकाचा फलंदाज नाही. पण तो दुहेरी भूमिका बजावू शकतो. तो मैदानावर ऋतुराजसाठी ‘दिशादर्शक’ ठरू शकतो.”

‘मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही…’, IPL 2026 पूर्वी टीकाकारांना शुभमन गिलचे सडेतोड प्रत्युत्तर

मला वाटते की मैदानावर या नवीन गोलंदाजी फळीला पाठिंबा देण्यात धोनी महत्त्वाची भूमिका बजावेल. मी गेल्या वर्षीही तिथे होतो. एमएसची इच्छा आहे की त्याने शेवटची तीन षटकं टाकावीत. पण अनेकदा आघाडीचे फलंदाज जास्त धावा करत नाहीत आणि त्याला फलंदाजीसाठी यावे लागते. यावेळी असे होऊ नये म्हणून, त्याने आघाडीच्या फळीला अधिक मजबूत केले आहे. कदाचित यावेळी, १४ सामन्यांपैकी, त्याला फक्त ३-४ सामन्यांमध्येच वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, किंवा तो फक्त शेवटीच फलंदाजीला येईल. त्याची सर्वात मोठी भूमिका यष्टीरक्षण करणे, क्षेत्ररक्षण लावणे आणि ऋतुराजला पाठिंबा देणे ही असेल.”

Web Title: R ashwin furious over dhoni being played as an impact player spinner big statement before ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2026
  • MS. Dhoni
  • R Ashwin
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.