फोटो सौजन्य - BCCI Women
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा संघ या स्पर्धेसाठी कसून मेहनत घेत आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाचे 36 दिवस शिल्लक असताना बीसीसीआय भारतीय संघासाठी अनेक कॅम्प्सचे आयोजन करत आहे. या आधी भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळणार आहे. भारताच्या संघासाठी ही स्पर्धा फारच महत्वाची आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना या खेळाडूंकडून फारच अपेक्षा आहेत.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ यावेळी भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. ही स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाचा संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एक विशेष योजना तयार केली आहे.
२०२५ च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा सराव शिबिर असेल. या दरम्यान सर्व खेळाडू सराव करताना दिसतील. टीम इंडियाचा हा सराव शिबिर आठवडाभर चालेल. खरंतर, टीम इंडियाचा सराव शिबिर २५ ऑगस्टपासून विशाखापट्टणममध्ये सुरू होईल, कारण टीम इंडियाला येथे २ सामने खेळायचे आहेत. जिथे टीम इंडिया ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी भिडेल.
भारताच्या संघाला काही सामने हे होम ग्राउंडवर खेळायचे आहेत त्यामुळे संघाला फायदा होऊ शकतो. भारतीय संघाचे दोन सामने हे विशाखापट्टणममध्ये खेळवले जाणार आहे. या मैदानावर भारताच्या खेळाडूंना चांगला अनुभव आहे. यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि स्नेह राणा या खेळाडूंचा समावेश आहे.याशिवाय, सध्याच्या विश्वचषक भारतीय संघातील खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव नाही, अशा परिस्थितीत, १ आठवड्याचा सराव शिबिर टीम इंडियाच्या खेळाडूंना खूप मदत करणार आहे.
A power packed #TeamIndia squad for the ICC Women’s Cricket World Cup 2025 💪
Harmanpreet Kaur to lead the 15 member squad 🙌🙌#WomenInBlue | #CWC25 pic.twitter.com/WPXA3AoKOR
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2025
यापूर्वी हे सामने बेंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होते, परंतु तेथे सामन्यासाठी प्रशासकीय परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे हे सामने विशाखापट्टणमला हलवण्यात आले. २०२५ च्या विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया २ सराव सामने खेळताना दिसेल. टीम इंडियाला हे २ सराव सामने इंग्लंड आणि न्यूझीलंडसोबत खेळायचे आहेत. हे सराव सामने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळले जातील.