
Asia Cup 2025: '...that's why Pakistan loses to India', says former Pakistani cricketer
पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी असा विश्वास दर्शवला आहे की, जेव्हा जेव्हा त्यांचा संघ भारताविरुद्ध मैदानावर उतरत असतो, तो भावनांमध्ये वाहून जातो आणि हेच एक कारण आहे की पाकिस्तानला नेहमीच महत्वाच्या सामान्यामध्ये भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. मागील दहा वर्षांत भारताने या ऐतिहासिक प्रतिस्पर्ध्यावर नेहमीच वर्चस्व गाजवलेले दिसून येते. भारत आणि पकसीतान यांच्यात खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने १२ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
पाकिस्तानचचे माजी खेळाडूने म्हटले की, जेव्हा आपण भारताविरुद्ध खेळत असतो, तेव्हा आपण खूप भावनिक होऊन जातो आणि घाईघाईने सर्वकाही साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच एक कारण आहे की आपण अनेकदा सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्यास अपयशी ठरतो आणि हरतो. लतीफ म्हणाले की, “दुसरीकडे, भारत खेळपट्टी आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळत असतो आणि म्हणूनच त्याला यश देखील प्राप्त होते. पाकिस्तानवर अपेक्षांचे ओझे असते आणि भारत त्याचा फायदा घेत आला आहे.”
रविवारी, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आशिया कपच्या गट टप्प्यात भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी, लतीफने भारतीय संघाच्या ताकदीचे देखील कौतुक केले आहे. लतीफ यांच्यामते, “भारतीय संघ संतुलन, संयम आणि कौशल्याचे मिश्रण असून ते इतर संघांपेक्षा खूप पुढे दिसून येत आहे.” लतीफ यांनी हार्दिक पंड्याला संघाचा ‘एक्स-फॅक्टर’ संबोधले आहे आणि सांगितले की त्याच्यात एकट्याने सामन्याचा मार्ग बदलण्याची ताकद आहे.
हेही वाचा : IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर..
लतीफ म्हणाले की , हार्दिक पंड्या हा एक धोकादायक खेळाडू असून मधल्या फळीतील फलंदाज किंवा खालच्या फळीतील फलंदाज सामन्याचे टेबल उलटू शकतात. हे त्याने खूप वेळा सिद्ध करून दाखवले आहे. याशिवाय, त्याने सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मासह संजू सॅमसन सारख्या खेळाडूंमुळे संघाचे संतुलन टिकून आहे असे म्हटले आहे. तर जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ही भारताची मुख्य ताकद असल्याचे म्हटले आहे.