
भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्याची तयारी करत आहे. 15 ऑगस्टपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. गॅल येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच जडेजा वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जाडेजा वीरेंद्र सेहवागच्या 374 सामन्यांची बरोबरी करणार आहे.
रवींद्र जाडेजाने 2009 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तीनही फॉर्मटमध्ये मिळून त्याने आतापर्यंत 373 सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध तो पहिला सामना खेळायला उतरताच सेहवागची बरोबरी करणार आहे. तसेच त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळल्यास तो सेहवागला मागे टाकून भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या स्थानावर पोहोचणार आहे.
रवींद्र जाडेजाची करिकीर्द
कसोटी सामने – 70 पेक्षा अधिक
वनडे सामने – 197
टी 20 सामने – 74
एकूण विकेट – 550 पेक्षा जास्त
एकूण रन्स – 6000 पेक्षा
भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारे
१. सचिन तेंडुलकर – ६६४ समोर
२. एम. एस. धोनी – ५३५ समोर
३. विराज कोहली – ५३०+ समोर
४. राहुल द्रविड – ५०४ सामने
५. रोहित शर्मा – ४८०+ सामने
६. मोहम्मद मेहरुद्दीन – ४३४ सामने
७. सौरव गांगुली – ४२१ समोर
८. अनिल कुंबळे – ४०१ समोर
९. युवराज सिंग – ३९१ सामने
१०. विरेंद्र सहवाग – ३७४ सामने
११. रविंद्र जाडेजा
आयपीएल 2026 च्या हंगामात रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे जाडेजा आयपीएलचे देखील काही सामने खेळू शकला नव्हता. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये त्याला संधी दिली आहे. जाडेजा हा ऑल राऊंडर खेळाडू असल्याने भारतीय संघाला फलंदाजी अन् गोलंदाजीत देखील फायदा मिळणार आहे. तसेच तो दोन सामने खेळल्यास सेहवागचा रेकॉर्ड देखील मोडेल.
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सिरिजचे कसे आहे वेळापत्रक
पहिली कसोटी – 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026
दुसरी कसोटी – 23 ते 27 ऑगस्ट 2026