Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GG Live Score : गुजरात जायट्सचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मानधना आर्मी करणार फलंदाजी

आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स आमनेसामने आहेत. गुजरात जायट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 16, 2026 | 07:22 PM
RCB vs GG Live Score: Gujarat Giants won the toss and elected to bowl! Mandhana's army will bat first.

RCB vs GG Live Score: Gujarat Giants won the toss and elected to bowl! Mandhana's army will bat first.

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs GG, WPL 2026 : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल  चॅलेंजर्स बंगळूरू आणि गुजरात जायट्स यांच्यात सामना होत आहे. या सामान्यापूर्वी गुजरात जायट्स संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. ॲशले गार्डनरच्या नेतृत्वाखालील जीजीने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात या संघाने विजय तर एकसामना गमावला आहे. यावेळी विजय मिळवून आपली कामगिरी सुधारण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. तर आरसीबीने या स्पर्धेत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसरा विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठण्याचे त्यांचे ध्येय असणार आहे.

टॉस जिंकल्यावर गुजरात जायट्सची कर्णधार ऍशले गार्डनर म्हणाली की, “आम्ही आज रात्री गोलंदाजी करणार आहोत. मला वाटते की प्रक्रियेच्या बाबतीत आमच्यासाठी काहीही बदलत नाही. या मैदानावर, गोलंदाजीसाठी तुम्हाला दोन किंवा तीन पर्यायांची गरज असते कारण फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खूप चांगली असून आम्ही आमच्या गोलंदाजीच्या सुरुवातीलाच खूप स्पष्ट असले पाहिजे, की आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करत आहोत की विकेट्स घेण्याचा. शिवानी सिंग आज पदार्पण करत आहे.”

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI: इंदूर ODI सामन्यात ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी! ‘ही’ कामगिरी करताच ‘या’ दिग्गजांचा मोडणार विक्रम

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने टॉस गमावल्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणाली की,” नाणेफेक कधीच तुमच्या नियंत्रणात नसते. मला वाटते की स्पर्धेच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या परिस्थितींचा अनुभव घेणे चांगले आहे. जर तुम्ही सुरुवातीला गोलंदाजी करत राहिलात आणि नंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली, तर त्याचा फायदा होतो. मी यावर खूश आहे. ग्रेस (हॅरिस) च्या बाबतीत, तिला फलंदाजी कशी करायची हे सांगण्याची गरज नाही, ती तिच्या पद्धतीनेच फलंदाजी करते. आमच्या सर्वांसाठी, आम्ही जे नियोजन केले आहे त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. जर आम्हाला अँकरची भूमिका बजावण्याची गरज पडली, तर आम्ही ते देखील करू शकलो पाहिजे. आम्हाला सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळायचे असून मी असे म्हणणार नाही की पुढे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत.”

हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : ‘धुळीच्या खेळपट्ट्यांवर तयारीने चांगली…’, राजकोट सामन्यातील शतकवीर डॅरिल मिशेलने केला मोठा खुलासा

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

आरसीबीचा प्लेइंग ११ : ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल

जीजीची प्लेइंग ११ : बेथ मुनी (डब्ल्यू), सोफी डेव्हाईन, ॲशले गार्डनर (क), शिवानी सिंग, जॉर्जिया वेरेहम, कनिका आहुजा, भारती फुलमाली, काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर

Web Title: Rcb vs gg live score gujarat giants won the toss and elected to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Ashleigh Gardner
  • Smriti Maandhana
  • WPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.