Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs LSG : अनुष्का-विराटचा मैदानावरच रोमँटिक सोहळा! RCB च्या विजयानंतर Flying Kiss देत साजरा केला आनंद; व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात विराट आणि अनुष्का यांच्यातील फ्लाइंग किसचा रोमँटिक क्षण बघायला मिळाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 28, 2025 | 08:31 AM
RCB Vs LSG: Anushka-Virat's romantic ceremony on the field! Celebrated by giving a Flying Kiss after RCB's victory; Video goes viral

RCB Vs LSG: Anushka-Virat's romantic ceremony on the field! Celebrated by giving a Flying Kiss after RCB's victory; Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आयपीएल 2025 चा शेवटचा म्हणजे ७० वा साखळी  सामना काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने बाजी मारली. बंगरूळुने लखनऊला 6 विकेट्सने पराभुत केले आहे. प्रथम फलंदाजी करत लखनऊने  कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने लढवय्या बाणा दाखवत विजय खेचून आणला. बंगरुळूच्या जितेन शर्माने तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि क्वालिफायर १ मध्ये प्रवेश निश्चित केला. या सामन्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या प्रेमाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.   विराट आणि अनुष्का यांच्यातील फ्लाइंग किसचा रोमँटिक क्षण सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Asian Athletics : स्पर्धेत भारताची पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी; Gulveer Singh ने केली सोनेरी कामगिरी…

अनुष्का-विराटचा रोमँटिक क्षण

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, विराट कोहली मैदानावर चालताच त्याची नजर स्टँडमध्ये बसून असलेल्या त्याच्या पत्नी अनुष्का शर्माकडे जाते. नेहमीप्रमाणे, यावेळीही विराटने आपले प्रेम व्यक्त करण्यास मागे पुढे बघितले नाही आणि त्याने अनुष्काला फ्लाइंग किस करत आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या. अनुष्का देखील हसून तिच्या पतीकडे फ्लाइंग किस पाठवताना दिसून आली. हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. चाहत्यांनी हा क्षण सोशल मीडियावर “रियल लव्हर्स” अशा कॅप्शनसह शेअर केला आहे.

Real Lover Boy! #virushka pic.twitter.com/e9eDSYHZrj

— TANYA SINGHANIA (@tanya_singhania) May 27, 2025

चाहते झाले भावूक

विराट कोहलीकडून नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर  हा व्हिडिओ समोर आला आहे. या निर्णयाने त्याचे चाहते भावूक झाले आहेत आणि अशा परिस्थितीत विराट-अनुष्काचा हा क्षण त्यांच्या हृदयावर फुंकर मारण्यासारखा होता.  विराटच्या निवृत्तीनंतर अनुष्का शर्मानेही एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिने लिहिले होते की, “आपण बनवलेल्या विक्रमांबद्दल बोलू, पण तुम्ही कधीही दाखवलेले अश्रू मला आठवतील. कोणीही पाहिलेले नसलेले भांडण. तुम्ही नेहमीच तुमच्या मनाचे ऐकले आहे आणि या निरोपाचा प्रत्येक भाग मिळवला आहे.” असे अनुष्काने लिहिले होते.

हेही वाचा : LSG vs RCB : जितेश शर्माने खेळली मॅचविनिंग खेळी! LSG च्या संघाला RCB ने 6 विकेट्सने केले पराभूत

सामन्याची स्थिति..

आयपीएल 2025 च्या ७० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.  या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने शानदार विजय मिळवला.  प्रथम फलंदाजी करत लखनऊने  कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्मा(३३ चेंडूत ८५ धावा) आणि विराट कोहलीच्या (३० चेंडूत ५४ धावा) अर्धशतकांच्या जोरावर २३० धावांचे लक्ष्य १९ व्या षटकातच पूर्ण केले. या विजयासह  बंगरूळुने क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला.

Web Title: Rcb vs lsg anushka virats flying kiss on the field after rcbs victory video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • IPL 2025
  • RCB Vs LSG
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.