फोटो सौजन्य : IndianPremierLeague
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु सामन्याचा अहवाल : आयपीएल 2025 चा शेवटचा नीट सामना आज पार पडला हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्या डावांमध्ये फलंदाजी करत लखनऊच्या संघाने 227 धावा केल्या होत्या. यामध्ये संघाचा कर्णधारी ऋषभ पंत याने शतकीय खेळी खेळली. या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यशस्वी झाला आणि आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने 6 विकेट्सने पराभुत केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर फिल सॉल्ट यांनी आजच्या सामन्यात 19 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या यात त्याने सहा चौकार मारले. विराट कोहलीने आणखी एकदा संघासाठी शतक झळकावले त्यांनी 30 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या आणि दहा चौकार मारले. रजत पाटीदार आज आणखी एकदा फेल ठरला तो या संघासाठी आज विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने सात चेंडू खेळल्या आणि 14 धावा करून बाद झाला. टीम डेविडच्या स्थानावर आज लियाम लिविंगस्टन याला संघामध्ये स्थान मिळाले होते पण पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
पंतचे शतक तर मार्शचे अर्धशतक, जोडीने केली कमाल! LSG चे RCB समोर 228 धावांचे लक्ष्य
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा स्टडींग कर्णधार जितेश शर्मा याने संघासाठी कमालिची खेळी आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 6 विकेट्सने पराभुत केले. या सामन्यात जितेश शर्मा याने आजच्या सामन्यात 33 चेंडुमध्ये 85 धावा केल्या यामध्ये त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याची साथ आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या जागेवर आलेला मयंक अग्रवाल याने दिली. मयंक अग्रवाल याने आजच्या सामन्यात 23 चेंडुमध्ये 43 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार मारले.
Match 70.Royal Challengers Bengaluru Won by 6 Wickets https://t.co/h5KnqyuYZE #LSGvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
लखनौने २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या आहेत. पंत व्यतिरिक्त मिचेल मार्शनेही ३७ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. याशिवाय निकोलस पूरननेही १० चेंडूत १३ धावा केल्या. आयपीएल २०२५ मध्ये, पंतचा शतकाचा दुष्काळ अखेर ७ वर्षांनी संपला. त्याने ६१ चेंडूत ११८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या काळात त्याने १९३.४४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.