
RCB VS MI, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून या हंगामातील सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. हे दोन्ही संघ नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. नाणेफेक गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत सजीवन सजनाच्या ४५ धावांच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५४ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १५५ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीकडून नादिन डी क्लर्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
नाणेफेक जिंकून आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. स्मृती मानधनाचा हा निर्णय आरसीबी गोलंदाजांनी सार्थ ठरवला कारण मुंबई इंडियन्सच्या दवाची सुरुवात चांगली झाली नाही. अमेलिया केर आणि जी कमलिनी या सलामी जोडीने मुंबईच्या डावाची सुरवात केली. परंतु, ही जोडी पहिल्या विकेट्ससाठी केवळ २१ धावा करू शकली. अमेलिया केर ४ धावा करून बाद झाली. तिला लॉरेन बेलने बाद केले. त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट मैदानात आली परंतु ती देखील झटपट बाद झाली. ब्रंट ४ धावा करून नादिन डी क्लर्कची शिकार ठरली.
नॅट सायव्हर-ब्रंट बाद झाल्यावर मैदानात आलेल्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर जी कमलिनी यांनी संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी २८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जी कमलिनी ३२ धावा करून बाद झाली. तिने २३ चेंडूत ३२ धावा केल्या. या खेळीत तिने ५ चौकार लगावले. तिला श्रेयंका पाटीलने बाद केले. कमलिनीनंतर कौर देखील २० धावा करून बाद झाली. तिला नादिन डी क्लर्कने माघारी केले. महत्वाचे फलंदाज बाद झाल्यावर निकोला केरी आणि सजीवन सजना या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला.
या दोघींनी चौफेर फटकेबाजी करत ८२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सजना २५ चेंडूत ४५ धावा(७ चौकार आणि १ षटकार) करून बाद झाली. तिला नादिन डी क्लर्कने आपली शिकार बनवले. तर निकोला केरी २९ चेंडूत ४० धावा करून माघारी गेली. तिने आपल्या खेळीत ४ चौकार लगावले. तिला देखील नादिन डी क्लर्कनेबाद केले. त्यानंतर अमनजोत कौर आणि पूनम खेमनार या दोघी प्रत्येकी ० धावा करून नाबाद राहिल्या. आरसीबीकडून नादिन डी क्लर्क सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : Bangladesh Voilence : मुस्तफिजूर रहमाननंतर बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा झटका! भारतीय प्रायोजकांची माघार
मुंबई इंडियन्स महिला : नॅट सायव्हर-ब्रंट, जी कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, निकोला केरी, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना, सायका इशाक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला : स्मृती मानधना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, दयालन हेमलता, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रेमा रावत, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल