टी-२० विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ घोषित(फोटो-सोशल मीडिया)
The Ireland squad has been announced : २०२६ आयसीसी टी-२० विश्वचषकाला एक महिन्यापेक्षा कमी वेळ बाकी असून सर्व संघ या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करताना दिसून येत आहेत. अशातच, आयर्लंडने या २०२६ च्या टी २० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. पॉल स्टर्लिंग संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे तर, उपकर्णधारपदी लोर्कन टकरची वर्णी लागली आहे.
हेही वाचा : WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार…
आयर्लंडचे राष्ट्रीय पुरुष संघ निवडकर्ता अँड्र्यू व्हाइटने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “आम्ही या टी-२० विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहोत असे म्हणणे कमी लेखण्यासारखे ठरणारे आहे, २०२२ मधील एका संस्मरणीय स्पर्धेनंतर, आम्ही कदाचित २०२४ मध्ये आमच्या सर्वोत्तम स्थितीत पोहचलो नव्हतो आणि तेव्हापासून सुधारणा करण्यास खूप उत्सुक आहोत. गेल्या १८ महिन्यांमध्ये, आम्ही विविध रणनीती, भूमिका आणि संघ संयोजनांचे प्रयोग केले असून स्पर्धेपूर्वी संघ चांगल्या स्थितीत असल्याचा आम्हाला जास्त आनंद आहे.”
आयर्लंडच्या संघात २२ वर्षीय अव्वल फळीतील फलंदाज आणि ऑफ स्पिनर टिम टेक्टर आणि २३ वर्षीय डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज बेन कॅलिट्झ आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू हम्फ्रीज यांचा समावेश करण्यात आला आहे. व्हाईट पुढे म्हणाले की, “नवीन खेळाडूंच्या समावेशामुळे संघात “अधिक गतिमान स्वभाव” निर्माण होतो.”
हेही वाचा : Bangladesh Voilence : मुस्तफिजूर रहमाननंतर बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा झटका! भारतीय प्रायोजकांची माघार
आयर्लंडला सह-यजमान श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि झिम्बाब्वेसह गट ब मध्ये स्थान दिले गेले आहे. आयर्लंड आपली मोहीम ८ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे. सर्व लीग सामने श्रीलंकेत पार पडणार आहेत.
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, लोर्कन टकर (उपकर्णधार), बेन व्हाइट, क्रेग यंग






