फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंडियन प्रीमियर लीग 2026 चा नवा सिझन सुरू व्हायला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. क्रिकेट चाहते या नव्या सिझनसाठी प्रचंड उत्सुक आहेत, या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये रजत पाटीदार आणि इशान किशन आमनेसामने येणार आहेत. पॅट कमिन्सच्या अनुपस्थित इशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मागील सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादची खराब कामगिरी राहिली होती तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघाने पहिल्यांदा जेतेपद नावावर केले होते.
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) पुढील हंगाम शनिवारी सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. आरसीबीने गेल्या वर्षी आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि या वेळीही तेच विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे, हैदराबादला कमी लेखता येणार नाही. हैदराबादची ताकद त्यांच्या स्फोटक फलंदाजीत आहे, ज्यात अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे.
आरसीबी संघात विराट कोहली, रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांसारखे खेळाडू आहेत. यात शंका नाही की दोन्ही संघ विजयाने सुरुवात करू इच्छितील. चाहते आयपीएलसाठी नेहमीच उत्सुक असतात. म्हणून, हा सामना केव्हा, कुठे आणि कसा अनुभवायचा, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
IPL 2026 च्या आधी सरफराज खान दमदार फार्ममध्ये! हा युवा खेळाडूचा होणार पत्ता कट? Video Viral
आयपीएल-२०२६ चा पहिला सामना हा आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे हा सामना 28 फेब्रुवारी रोजी शनिवारी रंगणार आहे. या पहिल्या सामन्याचे आयोजन हे बंगळूरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. आयपीएल 2026 चा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी उद्घाटन सोहळा होणार नाही. आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ७ वाजता होईल.
आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद हा सामना क्रिकेट चाहत्यांना लाईव्ह पाहण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग मोबाईलवर पाहण्यासाठी चाहते जिओहाॅटस्टारवर या सामन्यांची स्ट्रिमिंग पाहू शकतात.
Just 1️⃣ day until the defending champions RCB take the field. 😍#TATAIPL 2026 👉 #RCBvSRH | SAT, 28th MAR, 5.30 PM pic.twitter.com/gsJrovWF9W — Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2026






