Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 जानेवारीला पुणे धावणार ! फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 साठी नोंदणीला सुरुवात

5 जानेवारी (रविवार) 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या नोंदणीस आज दि. 17 डिसेंबर पासून सुरुवात होत असल्याची घोषणा फेडरल बँकेतर्फे करण्यात आली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 17, 2024 | 09:39 PM
5 जानेवारीला पुणे धावणार ! फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 साठी नोंदणीला सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:

येत्या 5 जानेवारी (रविवार) 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या नोंदणीस आजपासून सुरुवात होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. स्ट्रायडर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनचा उद्देश पुण्याची विविधता, एकता साजरी करणे तसेच सक्रिय जीवनशैलीसाठी बँकेची असलेली वचनबद्धता प्रकट करणे, हा आहे.

 मॅरेथॉनबद्दल माहिती

दिनांक : रविवार, जानेवारी 05, 2025
स्थळ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे
गट : पूर्ण मॅरेथॉन (42 किमी), अर्ध मॅरेथॉन (21 किमी), 10 किमी आणि 5 किमी
42 किमी पहाटे 4:00 वाजता
21 किमी पहाटे 5:00 वाजता
10 किमी पहाटे 5:30 वाजता
5 किमी सकाळी 6:15 वाजता

नोंदणी शुल्क: 500 रुपयांपासून सुरु + जीएसटीसह
नोंदणीची लिंक: https://www.federalbank.co.in/pune-marathon
नोंदणीची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2024.

मिलिंद सोमण हे  ब्रँड ॲम्बेसेडर

‘द सह्याद्री रन’ असे नामकरण करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट उलगडणार आहे. उत्साहाने सळसळणारे आणि फिटनेसला अनन्य साधारण महत्व देणाऱ्या पुणेकरांशी भावनिक बंध गुंफताना ही मॅरेथॉन समुदायाचा अभिमान फुलविण्याबरोबरच त्यांना स्वयंसुधारणांसाठी आणखी प्रेरित करत आहे. अनुभवी धावपटू असोत किंवा मैदानावरील आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे हौशी धावपटू असोत, प्रत्येकासाठी या मॅरेथॉनमध्ये शर्यतीचे खास गट आहेत. प्रसिद्ध फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 च्या पहिल्या आवृत्तीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, हे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुण्याची समुदाय भावना, आरोग्य आणि तंदुरुस्ती याला चालना देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध स्तरातील धावपटूंना मिलिंद सोमण यांच्या सहभागाने प्रेरणा मिळणार आहे.

फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस मूर्ती म्हणाले, “फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे. फेडरल बँकेसाठी पुणे ही अतिशय महत्त्वाची विस्तारणारी बाजारपेठ आहे. आम्ही नागपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूरमध्ये आमचा व्यवसाय वाढत असताना तेथील मॅरेथॉन्समुळे स्थानिक समुदायाशी जोडण्याची आम्हाला संधी मि‌ळत आहे. कॉस्मोपॉलिटन रुपामुळे पुण्याची इतर राज्यांच्या राजधान्यांशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन केवळ तेथील धावपटूंनाच पुण्याकडे आकर्षित करत नाही, तर त्यांच्या धावगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांनाही या शहरात आकर्षित करेल, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या बँकेतील सहकाऱ्यांनी अभिमान बा‌ळगावा अशा पध्दतीने ते ग्राहकांना प्रदान करत असलेली सेवा आणि समुदायाशी आमचे घट्टपणे जुळलेले बंध याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. या सुंदर मॅरेथॉनसाठी तयार झालेला माहौल वातावरणनिर्मिती करेल, अशी मला खात्री आहे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि त्यांच्यासंदर्भातील माहितीची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

एक ब्रँड म्हणून फेडरल बँक नेहमीच खेळ आणि फिटनेसचा प्रबळ समर्थक असून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे सातत्याने निरोगी जीवनशैलीचा प्रचार बँक करत आहे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉन हे क्रीडा आणि समाजाच्या कल्याणासाठी आमच्या वचनबद्धतेतील आणखी एक महत्वाचे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत, फेडरल बँकेने देशभरातील असंख्य मॅरेथॉन आणि क्रीडा स्पर्धांना प्रायोजकत्व आणि पाठबळ दिलेले आहे आणि त्याद्वारे सहभागास प्रोत्साहन देताना आरोग्य आणि निरोगीपणाची संस्कृती वाढवली आहे. खेळांमध्ये गुंतवणूक करताना व्यक्तींना सक्रिय जीवन जगण्यासाठी आणि फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे.
ही अविस्मरणीय मॅरेथॉन अनुभव चुकवू नका. आता नोंदणी करा आणि आगाऊ नोंदणीसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घ्या.

 

Web Title: Registration begins for federal bank pune marathon 2025 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 09:39 PM

Topics:  

  • Marathon
  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.