Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar :औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला हे सांगण्यासाठी आम्ही आयोगाला भेटलो, पुरावे सादर केले, पण सुरुवातीला आयोगाकडून पेपर फुटल्याचे नाकारले पण तपासानंतर पेपर फुटल्याचे मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला असून, तपासाचा अहवाल आणि एफआयआर सार्वजनिक केला जावा

  • By anuradha sagar
Updated On: Aug 26, 2026 | 03:04 PM
Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled:

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled:

Follow Us
Follow Us:
  • एमपीएससीने औषध निरीक्षक गट-ब पदाची भरती प्रक्रिया पेपरफुटीनंतर केली रद्द.
  •  एमपीएससी विद्यार्थ्यांशी पुणे येथे थेट संवाद साधून आयोगाच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती.
  •  पेपरफुटीचे पुरावे दिल्यानंतर आयोगाने चूक मानली; एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी.
Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: MPSC पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आयोगाने औषध निरीक्षक गट-ब पदाची भरती प्रक्रिया रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज MPSCच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

“राजकारण फार वंगाळ, यात शिरु नका. आम्हाला तुमच्यात उद्याचे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तलाठी आणि ड्रग इन्स्पेक्टर दिसतात. चांगले आणि प्रामाणिक अधिकारी हवे असतील, तर ते ज्या प्रक्रियेतून तयार होतात ती प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ असली पाहिजे,” असे रोहित पवार म्हणाले.

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

‘विद्यार्थ्यांचे कष्ट आम्हाला माहीत आहेत’

MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक संघर्षाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की,’ स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी तीन-चार तास झोप घेऊन, अनेकदा पोहे खाऊन दिवस काढत अभ्यास करतात. त्यात आता महागाईदेखील वाढली आहे, आधी तीन-चार रुपयांना मिळणारा चहा आता १० -१२ रुपये झाला आहे. दहा वर्षांपूर्वी पाच ते सात रुपये मिळणारे पोहे आता २५-३० रुपयावर गेले आहेत. तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता, पेण आज शेतकऱ्यांचीच अवस्था काय आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांचेच नव्हे, तर त्यांच्या पालकांचेही स्वप्न असल्याचे पवार यांनी सांगितले.

‘आयोगाकडे पुरावे दिले होते’

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला हे सांगण्यासाठी आम्ही आयोगाला भेटलो, पुरावे सादर केले, पण सुरुवातीला आयोगाकडून पेपर फुटल्याचे नाकारले पण तपासानंतर पेपर फुटल्याचे मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात एफआयआर दाखल झाला असून, तपासाचा अहवाल आणि एफआयआर सार्वजनिक केला जावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.

शासकीय कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

‘पेपर ४० लाखांना विकल्याचा आरोप’

औषध निरीक्षकाचा पेपर ४० लाख रुपयांना विकला गेला. गर्लफ्रेंडसाठी पेपर फोडला गेला. पण या प्रकरणात केवळ एकच व्यक्ती नसून आणखी काही लोकांहीच सहभाग असाण्याची शक्यता आहे. पण यात केवळ एकाच व्यक्तीचा समावेश असू शकत नाही, पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, त्याचा फायदा कोणाला झाला आणि या संपूर्ण प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, याचा सखोल तपास झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणामुळे औषध निरीक्षक गट-ब भरती रद्द झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. आता या प्रकरणातील तपास कितपत पुढे जातो आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title: Mpsc drug inspector exam cancelled rohit pawar interacts with students in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Exam
  • Pune
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
1

Saurabh Katiyar Appointed MPSC Secretary: सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
3

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
4

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.