Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rinku Singh : रिंकू सिंह बनला ‘रीजनल स्पोर्ट्स ऑफिसर’; जाणून घ्या किती मिळणार पगार…

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि 'फिनिशर' म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंह याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रिंकू सिंग याची उत्तर प्रदेश सरकारने 'प्रादेशिक क्रीडा अधिकारी' म्हणून नियुक्ती केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 25, 2026 | 01:20 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रिंकू सिंह याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
  • रिंकू सिंगचा किती मिळणार पगार ?
  • नेमकी भूमिका काय असणार?
Rinku Singh Salary  : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘फिनिशर’ म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंह याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याची उत्तर प्रदेश सरकारने ‘प्रादेशिक क्रीडा अधिकारी’ (Regional Sports Officer) म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून रिंकूला हे पद बहाल करण्यात आले आहे. त्याच्या या नवीन इनिंगमुळे क्रीडा विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या ‘टीम इंडिया’च्या संघात रिंकू हा एक महत्त्वाचा सदस्य होता. मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे: आपल्या या नवीन सरकारी नोकरीमध्ये रिंकूला प्रत्यक्षात किती पगार मिळणार आहे?

RCB vs SRH हायव्होल्टेज ड्रामा! 1300 चे तिकीट आता ४७ हजारांवर? ‘असे’ करा तुमचे बुकिंग

रिंकू सिंगचा किती मिळणार पगार ?

माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रादेशिक क्रीडा अधिकारी या पदासाठी रिंकू सिंगचा पगार ७०,००० ते ८०,००० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तथापि, ही रक्कम अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली किंवा दुजोरा मिळालेली पगार-रक्कम नाही.

प्रादेशिक क्रीडा अधिकाऱ्याची नेमकी भूमिका काय असते?

प्रादेशिक क्रीडा अधिकारी नक्की काय काम करतो, असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या पदावर असलेल्या व्यक्तीवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. या अधिकाऱ्यावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्रीडांगणे आणि क्रीडा-संबंधित पायाभूत सुविधांवर देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. राज्य सरकारची क्रीडा-संबंधित योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करणे, क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना घडवणे त्यांना प्रोत्साहन देणे यांसारख्या विविध कामांचा समावेश प्रादेशिक क्रीडा अधिकाऱ्याच्या कर्तव्यांमध्ये होतो.

Captain. Vice-Captain. Sorted 😌💜 pic.twitter.com/reeySu1chL — KolkataKnightRiders (@KKRiders) March 24, 2026

KKR मध्येही बढती

रिंकू सिंहने आयपीएल (IPL) आणि भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत राज्य सरकारने त्याला हा सन्मान दिला आहे. या नियुक्तीमुळे रिंकू आता केवळ मैदानातच नाही, तर प्रशासकीय पातळीवरही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असेल. गेल्या बऱ्याच काळापासून ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (KKR) संघाकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगवर, या फ्रँचायझीनेही एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी रिंकूची ‘उपकर्णधार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या हंगामात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करताना म्हणजे कर्णधार म्हणून दिसून येईल.

IPL 2026 आधी मोठी डील! Rajasthan Royals ची तब्बल 15,000 कोटींना विक्री; संघाचा नवा मालक कोण?

Web Title: Rinku singh salary for regional sports officer in uttar pradesh government marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • cricket news
  • cricket sports
  • IPL
  • IPL 2026
  • Rinku Singh
  • Salary

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
3

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.