फोटो सौजन्य - X
भारताचा संघ आता आशिया कपच्या तयारीला लागणार आहे, भारताच्या संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. टीम इंडिया सुर्याच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळताना दिसणार आहे. भारताच्या संघाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा संघ इंग्लड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताच्या संघाचे खेळाडू हे विश्रांती करत होते. या दरम्यान सध्या भारतामध्ये दिल्ली प्रिमियर लीग त्याचबरोबर यूपी प्रिमियर लीगचे सामने सुरु आहेत.
आजकाल भारतात अनेक वेगवेगळ्या लीग खेळल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे यूपी टी२० लीग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मेरठ मॅव्हेरिक्स आणि गौर गोरखपूर लायन्स यांच्यात ९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात मेरठ मॅव्हेरिक्सकडून फलंदाजी करताना कर्णधार रिंकू सिंगने शतक झळकावले. फलंदाजीदरम्यान रिंकूने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ज्यामुळे मेरठ मॅव्हेरिक्सने ६ विकेट्सने सामना जिंकला.
या सामन्यात मेरठ मॅव्हेरिक्ससमोर विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य होते. जे संघाने १८.५ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. मेरठ मॅव्हेरिक्सकडून फलंदाजी करताना रिंकू सिंगने ४८ चेंडूत १०८ धावांची नाबाद तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान रिंकूने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २२५ होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, गोरखपूर लायन्स संघ निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १६७ धावा करू शकला. आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये, विशेषतः स्पर्धेच्या सुरुवातीला, ही आता मोठी धावसंख्या मानली जात नाही. गोरखपूरसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कर्णधार ध्रुव जुरेल होता ज्याने डावाची सुरुवात केली आणि ३८ धावा केल्या, त्याच्याशिवाय निशांत कुशवाहाने ३७ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त, गोरखपूरचा कोणताही फलंदाज २५ धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.
RINKU SINGH MASTERCLASS IN UPT20 LEAGUE 🥶🔥
– 108* runs from just 48 balls including 7 fours & 8 Sixes while chasing 169 runs when 2nd best score was just 22*(22)
A Total One man show, Preparing well for Asia Cup. pic.twitter.com/Yl7QJUmdqq
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2025
मेरठकडून विशाल चौधरी आणि विजय कुमार यांनी प्रत्येकी सर्वाधिक ३ बळी घेतले. १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेरठ मॅव्हेरिक्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ८ षटकांत ३८ धावांवर आपले टॉप-४ फलंदाज गमावले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने पुन्हा असा गोंधळ घातला की गोरखपूरचा कोणताही गोलंदाज त्याच्यासमोर टिकू शकला नाही.
परिस्थिती पाहता, रिंकू सिंगने आपला डाव खूप हळू सुरू केला. त्याने पहिल्या ३४ चेंडूत फक्त ५८ धावा केल्या, परंतु त्यानंतर तो ५व्या गियरमध्ये आला आणि पुढील १४ चेंडूत ३६४.३ च्या स्ट्राईक रेटने ५० धावा केल्या आणि संघाला विजयाकडे नेले. या विजयासह, मेरठ मॅव्हेरिक्सचा संघ यूपी टी२० प्रीमियर लीग २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.