Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL 2nd Test: दुखापतीनंतर परतला अन् मैदान गाजवलं! Rishabh Pant ने रचला इतिहास; MS Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड केला उद्ध्वस्त

Rishabh Pant Surpasses MS dhoni in most Runs Wicketkeeper: कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एक मोठी कामगिरी केली. त्याने धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 01:41 PM
Rishabh Pant Surpasses MS dhoni in most Runs

Rishabh Pant Surpasses MS dhoni in most Runs

Follow Us
Follow Us:
  • पंतने रचला इतिहास
  • धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम केला ध्वस्त
  • सर्वाधिक धावा करणारे भारतीय विकेटकीपर-फलंदाज
भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ५ विकेट्स गमावून ३०० धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेच्या भूमीवर सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, पहिल्या दिवशी ऋषभ पंत काहीसा अस्वस्थ दिसला. पंतच्या हाताला चेंडू लागला, त्यानंतर तो दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात पंतला ही दुखापत झाली. पहिल्या दिवशी पंत केवळ १५ चेंडूंचा सामना करून फक्त ३ धावाच करू शकला. परंतु, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंतने इतिहास रचला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एस एस धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.

IND vs SL: शुभमन गिलने WTC मध्ये उडवला ‘धुरळा’! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

पंतने धोनीचा मोडला महारिकॉर्ड

दुसऱ्या दिवशी सारांश जैन लवकर बाद झाल्यानंतर, पंत मैदानात परतला आणि सावधपणे फलंदाजी करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने बॅटने एक नवीन इतिहास रचला. ऋषभ पंतने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक महत्त्वपूर्ण विक्रम मोडला आहे. पंत आता परदेशात किंवा तटस्थ मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज बनला आहे. पंतने आपल्या ३६व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली, तर धोनीला हा पराक्रम करण्यासाठी ४८ कसोटी सामने लागले. ऋषभ पंत इतिहास रचला पण तो  ८९ चेंडूमध्ये ६३ धावा करुन बाद झाला. केशारा  नुवांथाने ते त्याला तंबूत परत पाठवले.

ऋषभ पंतने परदेशातील/तटस्थ कसोटी सामन्यांच्या ६४ डावांमध्ये २,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ४१ पेक्षा जास्त राहिली आहे. तर, धोनीने ४८ कसोटी सामन्यांच्या ८३ डावांमध्ये ३२.८४ पेक्षा जास्त सरासरीने २,४९६ धावा केल्या आहेत. परदेशातील सामन्यांमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजांमध्ये फारुख इंजिनिअर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

 

परदेशात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय विकेटकीपर-फलंदाज

  • २५०२ – ऋषभ पंत
  • २४९६ – महेंद्र सिंग धोनी
  • १२०९ – फारूक इंजिनिअर
  • ११०९ – सय्यद किरमानी
ऋषभ पंत हा परदेशात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने भारताबाहेर सहा कसोटी शतके झळकावली आहेत. पंत सध्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचा विकेटकीपर-फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या या दोघांमध्ये धावांचा मोठा फरक आहे.

कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर-फलंदाज

  • महेंद्र सिंग धोनी – ४८७६
  • ऋषभ पंत – ३७०६
  • सय्यद किरमानी – २७५९
Hockey World Cup 2026: नेदरलँड्सकडून पराभव, सेमीफायनलचं गणित बिघडलं! अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार मोठा चमत्कार

Web Title: Rishabh pant surpasses ms dhoni in most runs as wicketkeeper batsman record ind vs sl 2nd test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • IND vs SL
  • MS Dhoni Captain
  • Rishabh Pant
  • Test Series

संबंधित बातम्या

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं
1

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.