उद्या ऋषभ पंत खेळणार की नाही? (फोटो- ians)
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना श्रीलंकेचा वेगवाव गोलंदाज कुमाराचा बॉल ऋषभ पंतच्या मनगटावर लागला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाली आणि तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र दुखापत झालेली असली तरी देखील दुसऱ्या दिवशी मैदानात येऊन त्याने श्रीलंकेविरुद्ध 63 रन्सची शानदार खेळी केली होती.
दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंत विकेटकीपिंग करण्यासाठी मैदानात येणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे उत्तर आता भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी दिले आहे. श्रीलंका दौऱ्यात ऋषभ पंतचे चांगली फलंदाजी केली आहे. सध्या वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. कर्णधार शुभमन गिलला तो लवकरच फिट होऊन खेळायला येईल असा विश्वास आहे.
IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज
भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतने वॉर्म-आप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या वेदनेमुळे त्याला हाताची हालचाल करताना अडचण येत होत होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय टीमने खबरदारीचा सल्ला म्हणून विकेटकीपिंग न करण्याचा सल्ला दिला होता. आज ऋषभ पंतच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असणार आहे. त्यावर तो उद्या खेळू शकेल की नाही याचा निरणायू घेतला जाणार आहे.






