Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma Birthday: स्वत:पेक्षा संघाला मोठं करणारा ‘कॅप्टन’; विक्रमांच्या ‘हिटमॅन’चा आज वाढदिवस

रोहित शर्माने आपली ओळख एक यशस्वी कर्णधार म्हणून निर्माण केली आहे. निस्वार्थी फलंदाजी हे रोहित शर्माचे खास वैशिष्ट्य आहे. त्याने भारतीय संघाला आशिया चषक आणि निधास ट्रॉफी जिंकवून दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 07:05 AM
Rohit Sharma Birthday: स्वत:पेक्षा संघाला मोठं करणारा ‘कॅप्टन’; विक्रमांच्या ‘हिटमॅन’चा आज वाढदिवस
Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघाची शान आहे रोहित शर्मा
रोहित शर्मा साजरा करतोय आपला 39 वा वाढदिवस
सिक्सर किंग म्हणून हिटमॅनची ओळख

Rohit Sharma Birthday Today: भारतीय क्रिकेटला एक मोठा इतिहास लाभला आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक मोठा दिग्गज खेळाडू झाले आणि आताही घडत आहेत. काही खेळाडू आपले कर्तुत्व सिद्ध करून दाखवत आहे. आज आपण अशाच एका खेळाडूविषयी बोलणार आहोत. मुंबईचा राजा, हिटमॅन अशा विशेषणांनी ओळख असलेला आपला सर्वांचा लाडका रोहित शर्मा. आज रोहित शर्मा आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

रोहित शर्मा मैदानावर असला की सामना भारतच जिंकणार असा आत्मविश्वास चाहत्यांना असतो. मैदानावर उतरला की चेंडू सीमारेषेबाहेर कसा जाईल याची गणितं मांडणारा फलंदाज, शांत डोकं आणि आक्रमक बॅटिंगचं समीकरण म्हणजे आपला ‘हिटमॅन’. बोरीवलीच्या गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक क्रिकेटच्या शिखरावर कसा पोहोचला, याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

रोहित शर्मा नाव आठवले की आठवतात ते गगनचुंबी सिक्सर. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ते दुसरा कोणी खेळाडू मोडू शकेल असे वाटत नाही. त्याने आपल्या नावावर केलेल्या रेकॉर्डबाबत जाणून घेऊयात.

‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण

1. वन-डे फॉर्मटमध्ये रोहित शर्मा जबरदस्त खेळी करतो, हे आपण अनेक सामन्यात पाहिलेच आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्धची 264 रन्सची खेळी आजही क्रिकेट जगतातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

2. सिक्सर किंग: इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तीनही प्रकरांमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे.

3. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने एकूण 5 शतके ठोकली आहेत.

4. 2024 मध्ये भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी -20 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.

यशस्वी कर्णधार

रोहित शर्माने आपली ओळख एक यशस्वी कर्णधार म्हणून निर्माण केली आहे. निस्वार्थी फलंदाजी हे रोहित शर्माचे खास वैशिष्ट्य आहे. त्याने भारतीय संघाला आशिया चषक आणि निधास ट्रॉफी जिंकवून दिली आहे. 2023 मध्ये सर्व सामने जिंकून त्याच्या नेतृत्वात भारताने फायनलमध्ये धडक मारली होती.

आयपीएलचा बादशाह

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक सिक्सर, एकाच टीमल अनेकदा विजेतेपद मिळवून देणे असे अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद पटकावून दिले आहे. फलंदाज म्हणूनही त्याने आयपीएलमध्ये 6000 हून रन्स केल्या आहेत.

Ro-Hit Man ‘ऑन फायर’; Mumbai Indians साठी केला ‘हा’ ‘विराट’ विक्रम, व्हाल थक्क

रोहित शर्माचे खेळणे कधी स्वतःसाठी नव्हते. तो कायम आपल्या संघासाठी खेळत आला आहे. यापुढेही तो त्या पद्धतीनेच खेळत राहणार आहे.  कधी दुखापतींनी त्याला घेरलं, तर कधी टीकाकारांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या, पण प्रत्येक वेळी हा ‘मुंबईचा मुलगा’ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत पुन्हा उभा राहिला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याचं नाव एका अशा ‘निस्वार्थी’ कर्णधाराच्या रूपात घेतलं जाईल, ज्याने स्वतःपेक्षा संघाला आणि आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच मोठं केलं.

Web Title: Rohit sharma 39th birthday today 5 ipl trophy t20 world cup sixer king hitman navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Captain Rohit Sharma
  • navarashtra special
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

National Ayurveda Day : केवळ उपचार नाही तर संतुलित जीवन जगण्याचे शास्त्र; जाणून घ्या आयुर्वेदाचे मानवी जीवनातील स्थान
2

National Ayurveda Day : केवळ उपचार नाही तर संतुलित जीवन जगण्याचे शास्त्र; जाणून घ्या आयुर्वेदाचे मानवी जीवनातील स्थान

World Sign Language Day: शब्दांशिवाय संवादाची जादू! वाचा 23 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन?
3

World Sign Language Day: शब्दांशिवाय संवादाची जादू! वाचा 23 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन?

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे
4

World Gratitude Day: ‘धन्यवाद’ एका शब्दाची जादू बदलायला हवी जीवनशैली; जाणून घ्या 21 सप्टेंबरचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.