केकेआरने मुंबईला दिले 221 धावांचे लक्ष्य
रोहित शर्माने ठोकले अर्धशतक
मुंबईच्या ओपनर्सची धडाकेबाज खेळी
Tata IPL 2026 MI vs KKR Live: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली आहे. रोहित शर्माने25 चेंडूत 52 धावा केल्या आहेत. केकेआरविरुद्ध रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ओपनर्स फलंदाजांनी शतकी भागीदारी केली. तर रिकल्टनने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स (IPL 2026) सहजरीत्या हा सामना जिंकेल असे चित्र दिसून येत आहे.
Lighting up the Wankhede Stadium in style 🤩 Rohit Sharma brings up his 5⃣0⃣th fifty-plus score in #TATAIPL 🫡 Updates ▶️ https://t.co/JmJcgsoHQ7#KhelBindaas | #MIvKKR | @mipaltan | @ImRo45 pic.twitter.com/b4aemNsbUE — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
MI पलटणला 221 धावांची गरज
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून हार्दिक पंड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सला (IPL 2026) विजयासाठी धावांचे लक्ष्य दिले आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली. कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन यांनी डावाची सुरुवात केली. फीन एलनने 17 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. त्याने 10 चेंडूत 18 धावा केल्या. अजिंक्य रहाणे 67 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने 21 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या. 13 ओव्हर्सनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या वेगवान फलंदाजीला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. रिंकू सिंग आणि सूर्यवंशीने चौथ्या विकेटसाठी 18 ओव्हरमध्ये केकेआरसाठी 200 धावांचा टप्पा पूर्ण केला. तर हार्दिक पंड्याने सूर्यवंशीला बाद करून ही जोडी तोडली.
KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).






