Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रोहित शर्मा हा सर्वकालीन महान नाहीच…’, संजय मांजरेकरांचे वादग्रस्त विधान ठरले चर्चेचा विषय 

संजय मांजरेकर आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात. संजय मांजरेकरने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा सर्वकालीन महान भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 09, 2025 | 08:07 PM
'Rohit Sharma is not the greatest of all time...', Sanjay Manjrekar's controversial statement became a topic of discussion

'Rohit Sharma is not the greatest of all time...', Sanjay Manjrekar's controversial statement became a topic of discussion

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Manjrekar’s controversial statement about Rohit Sharma : संजय मांजरेकर आपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या विधानांनी अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र जडेजासोबतच्या वादाचा फटका बसून मांजरेकरला कॉमेंट्री बॉक्समधूनही काढून टाकण्यात आले होते, परंतु मांजरेकर त्याचा मूळ  सभाव सोडायला तयार नाहीत. आता आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. तेव्हा या स्पर्धेआधी मांजरेकरने एक एक विधान केले आहे. संजय मांजरेकरने म्हटले आहे की भारतीय एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा हा सर्वकालीन महान भारतीय खेळाडूंमध्ये गणला जाऊ शकत नाही.

हेही वाचा : Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम..

नेमकं काय म्हणाला मांजरेकर?

संजय मांजरेकर म्हणाला, की “रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक सर्वोत्तम फलंदाज असला तरी, ‘ऑलटाइम इंडियन बॅटिंग ग्रेट’ च्या बाबतीत रेड-बॉल क्रिकेटला अधिक महत्त्व देण्यात येते. रोहित शर्माने  २०२५ च्या सुरुवातीला कर्णधार म्हणून भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावून दिले. त्यानंतर त्याने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३८ वर्षीय रोहित शर्माने बार्बाडोसमध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० स्वरूपाला अलविदा म्हटले.

संजय मांजरेकर दूरदर्शनवरील ‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’मध्ये म्हणाला की, “रोहित शर्माचा समावेश सर्वकालीन महान भारतीय फलंदाजांच्या यादीत करता येत नाही, कारण येथे फक्त आपण सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली सारख्या महान खेळाडूंबद्दल बोलत आहोत. रोहित या यादीत येऊ शकत नाही.”

संजय मांजरेकर पुढे म्हणाला की, “पण जर तुम्ही एकदिवसीय क्रिकेट, निस्वार्थीपणा किंवा कर्णधारपदाबद्दल बोलायचं म्हटले तर रोहित शर्माचे नाव घ्यावेच लागणार आहे. विशेषतः २०२३ च्या विश्वचषकानंतर लोकांमध्ये त्याच्याबाबत असणारे प्रेम पूर्णपणे वेगळ्या पातळीवर जाऊन पोहचले. चाहत्यांना  दिसले की, तो कधीही स्वतःबद्दल विचार करत नाही, तर संघाच्या फायद्यासाठी त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा त्याग करण्यास शर्मा तयार असतो. ही त्याची खरी खासियत राहिली आहे.’

मांजरेकर पुढे म्हणाला की, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या वर्चस्व नेहमीच पाहण्यासारखे असेच राहिले आहे, परंतु जेव्हा ‘ऑल टाईम इंडियन बॅटिंग ग्रेट’चा विचार करण्यात येतो. तेव्हा कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व देण्यात येते. मला वाटते की त्याने कसोटीत कोणताही मोठा प्रभाव पाडलेला नाही.”

हेही वाचा : Asia cup 2025 : UAE विरुद्ध भारत करणार आपल्या मोहिमेला सुरुवात, जाणून घ्या टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

 

Web Title: Rohit sharma is not an all time great says sanjay manjrekars controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Rohit Sharma
  • Sanjay Manjrekar

संबंधित बातम्या

BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार
1

BCCI ने ICC ची विनंती नाकारली, भारत-पाकिस्तान सामन्यात No Handshake सत्र सुरुच! आयुष म्हात्रेने हॅन्डशेक करण्यास दिला नकार

U19 IND vs PAK सामन्यात वैभव सुर्यवंशी स्वतात बाद! टीम इंडिया अडचणीत, आयुष म्हात्रे-आरोन जाॅर्जच्या हातात भारताची लाज
2

U19 IND vs PAK सामन्यात वैभव सुर्यवंशी स्वतात बाद! टीम इंडिया अडचणीत, आयुष म्हात्रे-आरोन जाॅर्जच्या हातात भारताची लाज

U19 Asia Cup : आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात Handshake होणार नाही का? आयसीसीकडे केली मागणी
3

U19 Asia Cup : आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यात Handshake होणार नाही का? आयसीसीकडे केली मागणी

IND vs PAK U19 : वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचा पराभवाचा सिलसिला थांबवेल का? शेवटचा विजय कधी मिळाला होता भारताला
4

IND vs PAK U19 : वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचा पराभवाचा सिलसिला थांबवेल का? शेवटचा विजय कधी मिळाला होता भारताला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.