पाकिस्तानी टीम(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास
पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उस्मान शिनवारीने आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीला राम राम केला आहे. यामुळे पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
USMAN SHINWARI HAS ANNOUNCED RETIREMENT FROM INTERNATIONAL CRICKET. pic.twitter.com/GsZJiO3e1e — Muasharaf Parvaiz (@MuasharafP) September 9, 2025
पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारीने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एकूण १७ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ३४ विकेट्स देखील घेतल्या. ४.९४ च्या इकॉनॉमीसह, शिनवारीने दोनदा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. याशिवाय, त्याने १६ टी-२० सामनेही खेळले आहेत. शिनवारीने टी-२० मध्ये १३ विकेट्स काढल्या आहेत. त्याच वेळी, त्याने पाकिस्तानी संघासाठी एक कसोटी सामना खेळला असून कसोटी सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली आहे.
उस्मान शिनवारीने २०१७ मध्ये पाकिस्तानकडून शानदार कामगिरी केली आहे. त्याने कामगिरी श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना चकित करून सोडले होते. २०१७ मध्ये शिनवारीने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच वेळी, शिनवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या सर्वात जलद गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. आता या ३१ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानी चाहत्यांना धक्का बसला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ






