Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: विराटच्या ऐतिहासिक शतकावर रोहितची प्रतिक्रिया! सेलिब्रेशन करताना दिली शिवी; सोशल मीडियावर खळबळ

Virat Kohli Century: रांचीमध्ये विराट कोहलीने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने त्याचे ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पूर्णपणे धुळीस मिळवून दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 30, 2025 | 09:22 PM
विराटच्या ऐतिहासिक शतकावर रोहितची प्रतिक्रिया!

विराटच्या ऐतिहासिक शतकावर रोहितची प्रतिक्रिया!

Follow Us
Close
Follow Us:

 

  • विराट कोहलीचे शतक आणि रोहित शर्माची शिवी
  • व्हिडिओ व्हायरल
  • सोशल मीडियावर खळबळ
IND vs SA 1st ODI: रांचीच्या मैदानावर विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट जोरदार तळपली. यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाल्यानंतर क्रिझवर आलेल्या विराटने सुरुवातीपासूनच कमालचा फॉर्म दाखवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली.

विराटचे शतक

रोहित शर्मा ५७ धावा काढून बाद झाला, पण विराटने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत वनडे क्रिकेटमधील आपले ५२वे शतक पूर्ण केले. कोहलीच्या या शतकाचा आनंद ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहितनेही खूप घेतला. मात्र, याच सेलिब्रेशनदरम्यानचा रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रोहित आनंद व्यक्त करताना काही अपशब्द (शिवी) बोलताना दिसत आहे.

हे देखील वाचा: IND vs SA 1st ODI: धोनीच्या होम ग्राऊंडवर कोहली-रोहितचे वादळ! दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले ३५० धावांचे विशाल लक्ष्य

विराटच्या सेलिब्रेशनमध्ये रोहितची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित आणि इतर खेळाडू कोहलीच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. विराटने शतक पूर्ण करताच रोहित, अर्शदीप सिंगसह सर्व खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवताना दिसतात. याच जल्लोषादरम्यान, रोहित शर्माच्या तोंडातून काही अपशब्द (Curse Word) बाहेर पडले, जे चुकून कॅमेऱ्यात कैद झाले.

Rohit celebrating Kohli’s century pic.twitter.com/x3CeWYv9yu — Abhishek (@be_mewadi) November 30, 2025


कोहली सुरुवातीपासूनच उत्कृष्ट लयीत दिसत होता आणि त्याने एकामागून एक शानदार शॉट्स मारले. विराटने ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याने आपले ‘विक्राळ रूप’ दाखवत १०२ चेंडूत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८३ वे शतक पूर्ण केले. कोहलीने १२० चेंडूंचा सामना करत १३५ धावांची दमदार खेळी केली, ज्यात ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके

रांचीत शतक झळकावून विराट कोहलीने इतिहास रचला आहे. कोहली एकाच फॉरमॅटमध्ये (वनडे) सर्वाधिक शतके (५२) ठोकणारा फलंदाज बनला आहे. यासह कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके ठोकली होती.

हे देखील वाचा: IND vs SA 1st ODI: सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक! रांचीत शतक होताच विराट कोहलीच्या पायावर पडला चाहता; मैदानात गोंधळाचे वातावरण

Web Title: Rohits reaction to virats historic century he insulted him while watching the celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Team India
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 
1

IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…
2

IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…

…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 
3

…म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा 

IND vs NZ 1st ODI: रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय! पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात; विराट कोहलीची ९३ धावांची खेळी
4

IND vs NZ 1st ODI: रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा विजय! पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात; विराट कोहलीची ९३ धावांची खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.