Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माफ करू शकतो पण…’ श्रीशांतचा हरभजन सिंहवर राग अनावर, ‘Slap Scandal’ प्रकरणातून 1 कोटी कमावल्याचा आरोप

'स्लॅप स्कँडल'च्या जाहिरातीतून नफा कमावल्याचा आरोप करत श्रीशांतने हरभजनसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. आता त्याने हरभजनला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 25, 2026 | 03:19 PM
श्रीशांतचा हरभजनसिंहवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

श्रीशांतचा हरभजनसिंहवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • श्रीशांतने पुन्हा केले हरभजन सिंहवर आरोप
  • सर्व सोशल मीडियावरून केले ब्लॉक 
  • स्लॅप स्कँडलवरून १ कोटी कमावल्याचा आरोप 
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चित ‘स्लॅपगेट’ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीशांतने नुकताच दावा केला आहे की, भज्जीने या घटनेतून १ कोटी रुपये कमावले आहेत. अलीकडेच, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सोशल मीडियावर कानाखाली मारण्याच्या घटनेचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना धक्का दिला होता. श्रीशांत म्हणतो की, त्याने ‘कानाखाली मारण्याच्या घटने’बद्दल भज्जीला माफ केले आहे, पण तो हे कधीही विसरणार नाही. त्याच्या या वक्तव्यानंतर, श्रीशांत आणि हरभजन सिंग यांच्या नात्यातील कटुता आता स्पष्ट झाली आहे.

हरभजनने जे केले ते मी विसरू शकत नाही – श्रीशांत

मल्याळम वृत्तपत्र ‘मातृभूमी’ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीशांत म्हणाला, “मी कोणत्याही मुलाखतीत भज्जीबद्दल कधीही बोललो नाही. ही पहिलीच वेळ असेल. आतापर्यंत काहीच समस्या नव्हती, पण त्याने या गोष्टीबाबत एक जाहिरात केली. त्याने त्यातून अंदाजे ८० लाख ते १ कोटी रुपये कमावले.” त्यानंतर त्याने मला फोन करून त्याबद्दल एक स्टोरी पोस्ट करण्यास सांगितले. मी त्याला सांगितले की मी त्याला माफ करेन पण कधीही विसरणार नाही. जर कोणी तुमच्याशी वाईट वागले, तर तुम्ही त्यांना माफ केले पाहिजे पण कधीही विसरू नये. जर तुम्ही विसरलात, तर ते पुन्हा तेच करतील आणि हरभजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

हरभजनसोबत माझे कोणतेही नाते नाही – श्रीशांत

श्रीशांत पुढे म्हणाला, “त्या व्यक्तीसोबत माझे कोणतेही नाते नाही. मी त्याला भाऊ म्हणायचो. पण गेल्या एक-दोन महिन्यापूर्वीच त्याने ती जाहिरात केली आणि आता मी त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे. माझ्या आई-वडिलांनी मला माफ करायला पण कधीही न विसरायला शिकवले आहे. त्याच्याबद्दल माझ्या काही तक्रारी नाहीत, आणि मला त्याची गरजही नाही. देव त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे भले करो. अनेक मुलाखतींमध्ये, अगदी अश्विनसोबतही, त्याने माझ्या मुलीबद्दल सांगितले. लोकांना वाटेल, ‘अरे, तो किती चांगला माणूस आहे.’ तो कदाचित चांगला माणूस असेल. पण माझ्यासाठी, मी भारतासाठी खेळल्यापासून ते आतापर्यंत, हे सर्व एक नाटक आहे.” श्रीशांतच्या मनातील हरभजनबाबतचा कडवटपणा पुन्हा एकदा यातून सिद्ध झाला आहे. 

कानाखाली मारण्याची घटना २००८ मधील

आयपीएलच्या पहिल्या हंगामात (२००८), पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर घडलेल्या थप्पड मारण्याच्या घटनेने क्रिकेट जगताला धक्का बसला होता. त्या सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. सामन्यानंतर, जेव्हा श्रीशांत हरभजन सिंगला भेटायला गेला, तेव्हा पराभवाने संतापलेल्या भज्जीने त्याला थप्पड मारली. या घटनेने सर्वांना धक्का बसला आणि हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली.

IPl 2025 : हरभजन सिंहला चाहत्यांनी केलं ट्रोल! खेळडूला पडलं महागात, वाचा सविस्तर

Web Title: S shreesanth ends all the ties with harbhajan singh blocked him claimed he earned rs 1 crore gain from slap scandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Harbhajan Singh
  • IPL
  • slapped

संबंधित बातम्या

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
1

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
2

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार
3

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
4

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.