फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, तर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. या सामन्याच्या दुसऱ्याच दिनी दुसऱ्या डावामध्ये 7 विकेट्स गमावले होते. आतापर्यंत या सामन्यात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
तिसऱ्या दिनी पहिल्या सेशममध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने अर्धशतक झळकावले पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीमध्ये फेल झाला. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंग संतापला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपला राग व्यक्त केला.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ १५९ धावांवर संपला. त्यानंतर भारताचा यशस्वी जयस्वालही बाद झाला. अशाप्रकारे, पहिल्या दिवशी एकूण ११ विकेट्स पडल्या. दुसऱ्या दिवशी भारताचा डाव १८९ धावांवर संपला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स गमावल्या. परिणामी, दुसऱ्या दिवशीही १६ विकेट्स पडल्या. हे पाहून हरभजन सिंग सोशल मीडियावर संतापला.
त्याने पोस्ट केले, “कसोटी क्रिकेट, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या दिवसाचा खेळ जवळजवळ संपला आहे, अजून संपलेला नाही. कसोटी क्रिकेटचा हा किती विनोद आहे #RIPTESTCRICKET.” अर्थात, कसोटी क्रिकेट पाच दिवस चालते, परंतु भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्याचा सामना अवघ्या अडीच दिवसात संपेल असे दिसते. दोन्ही संघांच्या खराब कामगिरीवर हरभजन सिंग संतापला.
Test cricket india vs South Africa the game almost over on 2nd day isn’t finished yet . What a mockery of test cricket #RIPTESTCRICKET — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 15, 2025
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर रोखण्यात आले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या आणि प्रत्युत्तरादाखल भारताने १८९ धावा केल्या. यामुळे भारताला पहिल्या डावात ३० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेने ३५ षटकांत सात विकेट्स गमावून ९३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडे आता ६३ धावांची आघाडी आहे.






