SA vs PAK 2nd test Shan Masood created history the first Pakistani captain to score a Test century in South Africa
ICC Penalised Pakistan : ICC ने पाकिस्तान क्रिकेट संघाला दंड ठोठावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पराभवानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या कसोटीदरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला दंड ठोठावण्यात आला आहे. याची भरपाई खेळाडूंना मॅच फीमधून करावी लागणार आहे.
कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव
वास्तविक, केपटाऊन कसोटीत पाकिस्तानला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तानला दंड ठोठावण्यात आला आहे. संघातील खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के दंड भरावा लागेल. पाकिस्तानी संघाने निर्धारित वेळेत 5 षटके कमी टाकली होती. याबाबतची माहिती आयसीसीने आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे. ही बाब त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहे.
आर्थिक दंडासह गुण वजा केले जातील –
पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या खेळाडूंना मॅच फी भरावी लागेल. यासोबतच गुणही कापले जातील. आयसीसीने सांगितले की, पाकिस्तानने 5 षटके कमी टाकली. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून पाच गुण वजा केले जातील. आयसीसीच्या नियमांनुसार, निर्धारित वेळेत कमी षटके टाकल्यास दंड म्हणूनही गुण कापले जाऊ शकतात. त्यामुळे एका षटकाचा एक गुण वजा करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 5 गुण वजा केले जातील.
अशी होती पाकिस्तानची कसोटी मालिका –
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना शानदार पद्धतीने जिंकला. दुसऱ्या सामन्यात त्याला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला फॉलोऑन दिला होता. मात्र, पाकिस्तानने दुसऱ्या डावात ताकद दाखवत 400 धावांचा टप्पा पार केला. त्यासाठी शान मसूदने शतक झळकावले होते.
हेही वाचा : India Open Super 750 : लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, या खेळाडूंवरसुद्धा असणार नजर