Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Para Games: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिनने मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम ठेवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2026 | 02:12 PM
मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम

मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम

Follow Us
Follow Us:
  • एशियन पॅरा गेम्समध्ये सचिन खिलारीने जिंकले गोल्ड मेडल
  • गोळाफेक F46 जिंकले देशासाठी पदक
  • आतापर्यंत भारताने जिंकले 47 पदके
Asian Para Games: सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. भारताने आतापर्यंत एकूण 47 पदके जिंकली आहेत. त्यातच आता आणखी एका गोल्ड मेडलची भर पडली आहे. सचिन खिलारीने गोळाफेक F46 या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. सचिन खिलारीचे देशभरातून कौतुक केले जात आहे.

जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारी याने इतिहास रचला आहे. पुरुष शॉट पुट F46 क्रीडा प्रकारात सचिनने सुवर्ण पदक जिंकले आहे. तसेच त्याने एका नवीन नव्या आशियाई पॅरा गेम्स रेकॉर्डची नोंद देखील केली. या क्रीडा प्रकारात भारताने तीनही पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे.

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिनने मागील वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये जिंकलेले आपले सुवर्ण पदक कायम ठेवले आहे. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात १५.८७ मीटर लांब थ्रो करत पहिले स्थान पटकावले आहे.  भारताच्या मोहम्मद यासिरने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात १५.०६ मीटर थ्रो करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. भारताच्याच परवीन यांनी १४.९४ मीटर अंतर पार करत तिसरे स्थान मिळवले आणि कांस्य पदक जिंकले आहे.

पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये ‘F46’ हा वर्ग महत्वाचा समजला जातो. ज्यांच्या अवयवांमध्ये  (हातांमध्ये) शारीरिक अक्षमता किंवा कमतरता असते अशा खेळाडूंसाठी हा वर्ग तयार करण्यात आला आहे. या वर्गातील खेळाडू उभे राहून स्पर्धांमध्ये भाग घेतात. शॉट पुट किंवा इतर थ्रोइंग इव्हेंट करताना खेळाडूंना हाताच्या संपूर्ण ताकदीऐवजी आपल्या कंबर आणि पायांच्या ताकदीचा वापर करून गोळा किंवा थाळी फेकावी लागते. यासाठी प्रचंड शारीरिक संतुलन आणि ताकदीची आवश्यकता लागते.

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!

जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. महिलांच्या ६७ किलो वजनी गटात भारताच्या कस्तूरी राजमणि यांनी भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे. तमिळनाडूच्या रहिवासी असलेल्या कस्तूरी यांनी आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात १०८ किलो वजन यशस्वीपणे उचलत दुसरे स्थान पटकावले आणि भारताच्या पदकतालिकेत आणखी एक पदक जिंकले.

Web Title: Sachin khilari wins gold f46 group asian para games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • gold medal
  • Sports News

संबंधित बातम्या

गोल्डन बॉईजचा जलवा! Asian Para Games मध्ये आयुष वर्माला सुवर्णपदक; प्रवीण कुमारने रेकॉर्ड मोडत रचला इतिहास
1

गोल्डन बॉईजचा जलवा! Asian Para Games मध्ये आयुष वर्माला सुवर्णपदक; प्रवीण कुमारने रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!
2

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!

Football: यजमान लोयोलाचा दुहेरी पराभव! सेंट व्हिन्सेंट्स अन् ‘हे’ संघ ठरले फुटबॉलचे नवे चॅम्पियन
3

Football: यजमान लोयोलाचा दुहेरी पराभव! सेंट व्हिन्सेंट्स अन् ‘हे’ संघ ठरले फुटबॉलचे नवे चॅम्पियन

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम
4

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.