चेतेश्वर पुजारा(फोटो-सोशल मीडिया)
Cheteshwar Pujara retirement : काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर पुजारा आता नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तो आता लवकरच त्याची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. भारतीय संघाचा विश्वासार्ह फलंदाज चेतेश्वर पुजारा आता प्रशिक्षक किंवा बीसीसीआयच्या एनसीए (सेंटर ऑफ एक्सलन्स) या भूमिकेत कोणतीही जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. पुजाराकडून सांगण्यात आले आहे की, तो क्रिकेटशी जोडलेला राहू इच्छित आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी पूजाराने एका मीडिया एजन्सीशी बोलताना त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. पुजाराने भारतासाठी १०३ सामन्यांमध्ये ७००० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. पुजारा म्हटला की, मला प्रसारणाचे काम आवडते. मी ते करत राहणार आहे. कोचिंग किंवा एनसीएबद्दल सांगायचे झाले तर मी त्यासाठी देखील तयार आहे.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर
चेतेश्वर पूजाराने सांगितले की, “मी याबद्दल विचार केलेला नसून मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी यावर निर्णय घेणार आहे. मी आधीही सांगितले आहे की मला खेळाशी जोडलेले राहायचे आहे.” पुजाराने पुढे सांगितले की, “भारतीय क्रिकेटमध्ये मला शक्य होईल तेवढे योगदान देण्यास आनंद होईल. खेळातून निवृत्ती घेतल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. आजकाल कसोटी क्रिकेट पूर्वीसारखे पारंपारिक पद्धतीने खेळण्यात येत नाही. परंतु तरीही पारंपारिक फलंदाजांचे महत्त्व कायम आहे.”
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या क्लासिकल फलंदाजी कमी होत असून याचे दुःख आहे का? असे पूजाराला विचारण्यात आले. त्यावर पुजारा म्हटलं की, “मी दुःखी नाही. मला वाटते की आजच्या काळातही क्लासिकल फलंदाज खूप महत्त्वाचे आहेत. पण काळ बदलत आहे आणि त्यासोबत बदल करणे देखील गरजेचे आहे.”
पुजारा म्हणाला की जर त्याला एखाद्या तरुण खेळाडूला सल्ला द्यायचा झळा तर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) खेळायला सांगणार आहे. कारण आजकाल मर्यादित षटकांचे क्रिकेट जास्त खेळण्यात येते. पुजाराने असे देखील म्हटले की, आता फक्त अशाच खेळाडूंची कसोटी संघात निवड केली जाते जे आयपीएल किंवा एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन करतात. म्हणूनच त्यांच्या फलंदाजीत आक्रमकता दिसून येत आहे.