ध्रुव शौरी(फोटो-सोशल मीडिया)
Dhruv Shauri made history : विदर्भाचा विश्वासार्ह फलंदाज असणाऱ्या ध्रुव शौरीने बीसीसीआयने आयोजित केलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध शानदार शतक झळकवून इतिहास घडवला आहे. हैदराबादविरुद्धच्या शतकासह, तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकणारा संयुक्त पहिला खेळाडू ठरला आहे. ७७ चेंडूचा सामना करत नाबाद १०९ धावा काढत, शौरीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. यापूर्वी या विक्रम केवळ नारायण जगदीसनच्या नवे जमा होता.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरणाऱ्या, शौरीने अमन मोखाडे आणि यश राठोड यांच्यातील १४८ धावांच्या मजबूत सलामी भागीदारीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या संयमी आणि आक्रमक खेळीमध्ये शौरीने नऊ चौकार आणि तीन षटकार लगावले. ज्यामुळे विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना ३६५/५ अशी मोठी धावसंख्या गाठली. लिस्ट ए क्रिकेटमधील हे त्याचे आठवे शतक ठरले.
२०२४-२५ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांपासून शौरीचे नाणे खणखणीत वाजले. गेल्या हंगामात त्याने क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये सलग शतके लागावली होती. करुण नायरसोबत शौरीने विदर्भाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या हंगामात त्याने आठ डावांमध्ये ७०.४७ च्या सरासरीने आणि ९२.६८ च्या स्ट्राईक रेटने ४९४ धावा फटकावल्या आणि संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
शौरीची सलग पाच शतके
या प्रतिष्ठित यादीमध्ये देवदत्त पडिककल, कुमार संगकारा आणि अल्विरो पीटरसन सारख्या दिग्गजांचा देखील समावेश असून ज्यांनी सलग चार शतके झळकावलेली आहेत. संगकारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारा एकमेव फलंदाज असून शौरीची कामगिरी केवळ विदर्भासाठीच नाही तर भारतीय स्थानिक क्रिकेटसाठी देखील एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे.






