Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

Kho-Kho: १७ वर्षांखालील गटातही संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी द्वितीय, तर कन्या प्रशाला, लोणी काळभोरने तृतीय क्रमांक मिळवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 03:04 PM
Kho Kho tournament

Kho Kho tournament

Follow Us
Follow Us:

१४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांचे विजेतेपद
दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
दोन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

देहू: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या विद्यमाने आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू यांच्या सहकार्याने आयोजित हवेली तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. या दोन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा देहू येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू पूर्वा वाघ व राष्ट्रीय खो-खो खेळाडू आकाश टकले यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. जगन्नाथ लकडे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिताताई चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेशभाऊ काळोखे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, मेघाताई सागर काळोखे उपस्थित होते.

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

त्यासोबतच चैत्राली भसे, नारायण मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, अजित मोरे, अविनाश भसे, गणेश मराठे, विकास कंद, वनिता देशकर, मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर, सौ. विद्या कांबळे, सौ. स्वालेहा पठाण यांच्यासह रयत संकुल, देहू येथील शिक्षकवृंद व फिनिक्स क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींचे तब्बल ५५ संघ, तर दुसऱ्या दिवशी मुलांचे ५६ संघ स्पर्धेत सहभागी झाले.

मुलींच्या गटातील अंतिम निकाल

१४ वर्षांखालील गटात संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम; भेकराई माता माध्यमिक विद्यालय, भेकराईनगर द्वितीय, तर हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय, फुलगाव तृतीय, १७ वर्षांखालील गटातही संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामीण सर्वांगीण विकास माध्यमिक विद्यालय, कुंजीरवाडी द्वितीय, तर कन्या प्रशाला, लोणी काळभोरने तृतीय क्रमांक मिळवला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात जोगेश्वरी माता विद्यालय, वाडेबोल्हाई प्रथम, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय, तर संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहूने तृतीय क्रमांक मिळवला.

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विजेत्या संघांना क्रीडा मार्गदर्शक संदीप चव्हाण व सचिन दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर यांनी खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मगर व सुनील घुमटकर यांनी केले, तर आभार सचिन दळवी यांनी मानले.

Web Title: Sant jijabai vidyalaya wins haveli taluka level kho kho tournament pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Kho Kho Tournament
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
2

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
3

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
4

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.