Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sara Tendulkar : पप्पांचे सामाजिक कार्य नेणार पुढे; सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट टाकत लेकीचे केले कौतुक

मला सांगताना आनंद होतोय की, माझी मुलगी माझ्या सामाजिक कार्यात अधिकृत सहभागी होतेय. फाउंडेशनच्या संचालकपदावर ती काम करणार, अशी पोस्ट टाकत सचिन तेंडुलकरने लेकीच्या नवीन कार्याचे कौतुक केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 04, 2024 | 06:40 PM
I’m overjoyed to share that my daughter @saratendulkar has joined the @sachintendulkarfoundation as Director

I’m overjoyed to share that my daughter @saratendulkar has joined the @sachintendulkarfoundation as Director

Follow Us
Close
Follow Us:

Sara Tendulkar : भारताचा दिग्गज क्रिकेटर तथा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपल्या लेकीच्या नवीन कार्याचे कौतुक केले आहे. सारा तेंडुलकरवर आता सचिन तेंडुलकर फाउंडेशनची जबाबदारी असणार आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने इन्स्टावर पोस्ट टाकताना, लंडनहून क्लिनिकल पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आता ती सचिनच्या फाउंडेशनचे काम पुढे नेणार आहे. यामध्ये गरीब, मागास, सामाजातून दुरावलेल्या घटकांसाठी ती काम करणार आहे. सोशल मीडियावर तिचा मुलांसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली इन्स्टावर पोस्ट

देशाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने साराव मोठी जबाबदारी सोपवली आहे. साराची सचिन तेंडुलकर फाउंडेशनची अधिकृत संचालकपदी नेमणूक झाल्याचे खुद्द सचिननेच जाहीर केले आहे. सचिन म्हणतोय, ‘माझी मुलगी सारा तेंडुलकर सचिन तेंडुलकर फाउंडेशनहसह अधिकृत जोडली गेली असून, ती संचालक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे, हे सांगताना मला आनंद होतोय, अशी पोस्ट सचिनने इन्स्टावर टाकली आहे.
साराने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर आता पप्पांचे सामाजिक कार्य पुढे नेणार आहे. देशातील वंचित, गरीब, मागास, सामाजिक व्यवस्थेतून बाहेर असलेल्या मुलांसाठी ती आता काम करणार आहे. साराने क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षण याद्वारे भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात केली असताना, जागतिक शिक्षण कसे पूर्ण होऊ शकते याची आठवण करून देणारे आहे, असंही सचिनने या एक्स पोस्टमध्ये नमूद केलंय.
सचिन तेंडुलकर फाउंडेशन
सचिन तेंडुलकर फाउंडेशन अंतर्गत 2019 पासून देशातील विविध भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि अन्य क्षेत्रात काम केलं जातं. सारा आणि तेंडुलकर कुटुंबिय हे सातत्याने सचिन तेंडुलकर फाउंडेशनसाठी काम करत असतात. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनकडून सिहोर जिल्ह्यातील पाच केंद्र दत्तक घेण्यात आली आहेत. त्यानुसार नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुनझील आणि सेवानिया ही 5 केंद्र दत्त घेण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 3 ते 15 या वयोगटातील मुलांना शिक्षण आणि मोफत जेवण दिलं जातं.

सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघांनी काही महिन्यांपूर्वी जामुनझिल आणि सेवानिया या सचिन तेंडुलकर फाउंडशेनअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या केंद्राला भेट दिली होती. तेव्हा सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघींनी त्या केंद्रातील मुलांसह वेळ घालवला होता. साराने या भेटीनंतर सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिचे आजोबा साहित्यिक आणि प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचा वारसा असाच पुढे सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

काय म्हणाली सारा
“मला माझ्या जीवनातील पहिलंच वर्ष आजोबांसह घालवता आलं. मात्र मला त्यांची शिक्षणाप्रती असलेली ओढ माहितीय. मी त्यांच्याबाबत एकूण मोठी झालीय. शिक्षणामुळे अनेक संधी उपलब्ध होतात. शिक्षणात अनेक संधी उपलब्ध करुन देण्याची शक्ती आहे. माझ्या आजोबांना शिक्षणाबाबतच्या या वाक्याचा नेमका अर्थ मला या केंद्राला भेट दिल्यानंतर उमगला”, असं साराने तेव्हा म्हटलं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता सारा आजोबांचा वारसा या फाउंडेशनच्या माध्यमातून चालवणार आहे. साराला तिच्या या नव्या प्रवासासाठी नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा यूएईवर बरसला कहर; भारताचा दुबईवर 10 विकेट्स राखून दणदणीत विजय

Web Title: Sara tendulkar will take her fathers social work forward sachin tendulkar post on instagramm praises her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 06:04 PM

Topics:  

  • cricket
  • Indian Cricketer
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.