Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं

Saransh Jain takes 7 wickets against Bihar Ranji Trophy: मध्य प्रदेशचा स्टार फिरकी गोलंदाज सारांश जैनने बिहारविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतले आणि संपूर्ण संघाला ९९ धावांवर गारद केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 26, 2026 | 07:10 PM
Saransh Jain

Saransh Jain

Follow Us
Follow Us:
  • सारांश जैनची भेदक गोलंदाजी
  • ७ विकेट्सच्या जोरावर बिहारची दाणादाण
  • सारांश जैनची शानदार कामगिरी
Saransh Jain : रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेत बिहार आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात बिहारचा करणधार साकिबुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय बिहारसाठी चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. मध्य प्रदेशचा फिरकी अष्टपैलू खेळाडू सारांश जैनने या सामन्यात दमदार कामगिरी केली. सारांशने ७ विकेट्स घेऊन बिहार संघाचे कंबरडे मोडले आहे. बिहारला पहिल्या डावात १०० धावासुद्धा करता आल्या नाहीत.

French Open 2026: विजयाच्या उंबरठ्यावर स्वप्नं भंगलं! PV Sindhu ची झुंज अपुरी; An Se Young ने सलग तिसऱ्यांदा जिंकले जेतेपद

सरांश जैनने फिरकीचा कहर

२०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये सर्व संघ आपला तिसरा सामना खेळत आहेत. मध्य प्रदेशचा आणि बिहार यांच्यात होळकर स्टेडियमवर सामना सुरु आहे. बिहारचा कर्णधार साकिबुल गनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरला. बिहारचा संपूर्ण संघ ९९ धावांवर तंबूत परतला झाला. रणजी ट्रॉफीमध्ये १०० धावांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरण्याची ही बिहारची चौथी वेळ ठरली.

होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे सारांश जैनच्या नावावर होता. त्याने १३ षटकांत केवळ ४० धावा दिल्या आणि ७ विकेट्स घेतले. बिहारचा एकही फलंदाज त्याच्यासमोर टिकू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सारांशची सर्वोत्तम कामगिरी होती. यासोबतच त्याने आपले २०० विकेट्सही पूर्ण केले. आदित्य राज त्याचा २०० वा विकेट ठरला.

बिहारची अत्यंत खराब फलंदाजी

बिहारच्या फलंदाजांनी पुन्हा अत्यंत निराशाजनक सुरुवात केली. आवेश खानने पहिल्याच षटकात नमन गौरव आणि श्रमन निग्रोध यांना बाद केले. त्यानंतर आयुष लोहरुखा सारांश जैनने १८ धावांवर बाद झाला. ३७ धावांवर असताना बिहारला चौथा धक्का बसला. सारांशने कर्णधार घनीला बाद केले. जैनने लगेचच आकाश राजला शून्यावर बाद केले. ३७ धावांवर बिहारचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सारांशने रघुवेंद्र प्रताप सिंगला बाद करून आपले चार विकेट्स पूर्ण केले. यानंतर, बिहारचे विकेट पडण्याचे सत्र सुरुच होते. आदित्य राजला बाद करून आपली पाचवी विकेट घेतली. बिहारचा कोणताही फलंदाज सारांशच्या फिरकीसमोर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला.

Rohit Sharma: ‘मी निवृत्त होणार…’ रिटायरमेंटच्या चर्चांवर हिटमॅनने अखेर सोडलं मौन; एका वाक्यात सांगितलं सगळं

Web Title: Saransh jain 7 wickets bihar vs madhya pradesh ranji trophy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • bihar
  • Jain
  • madhya pradesh
  • ranji trophy 2026

संबंधित बातम्या

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
1

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
2

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…
3

Pension News: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हवी असेल तर त्वरित करा जीवन प्रमाणीकरण, अन्यथा…

Sai Kishore: तामिळनाडूच्या स्टार खेळाडूची रणजी ट्रॉफीमध्ये Hat-Trick; 10 विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय
4

Sai Kishore: तामिळनाडूच्या स्टार खेळाडूची रणजी ट्रॉफीमध्ये Hat-Trick; 10 विकेट्स घेत संघाला मिळवून दिला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.