
‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’
शेवटच्या क्रमांकावरून सुरुवात रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये ‘पोल पोझिशन’वरून सुरूवात करताना सार्थकला सुरूवातीला थोडा अडथळा आला, ज्यामुळे किशोरवयीन रायडर आणि त्याचा पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघातील सहकारी रक्षित दवे याला आघाडी घेण्याची संधी मिळाली. या दोघांनी शेवटच्या लॅपपर्यंत आपापले स्थान टिकवून ठेवले.
पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!
मात्र शेवटच्या लॅपमध्ये सार्थकने ‘टर्न-४’वर रक्षितला मागे टाकले आणि विजय मिळवला. त्याच्यामागे हैदराबादच्या राहिल पिल्लरीसेट्टी याने तिसरे स्थान मिळवले. या गटाच्या दोन्ही शर्यतीमध्ये सार्थकने आपला अव्वल क्रमांक संपादन केला. स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये सार्थक याला भाग घेता आला नव्हता त्यामुळे सार्थकने पहिल्या रेसमध्ये शेवटच्या क्रमांकावरूनही सुरूवात करत अव्वल क्रमांक मिळवला.
‘इलेक्ट्रिक आरटीई’ गटातही अव्वल स्थान पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेत सार्थक चव्हाणने आपली विजयांची मालिका कायम राखत तीन फेऱ्यांच्या ‘इलेक्ट्रिक आरटीई’ या गटात अव्वल स्थान मिळवून तिहेरी मुकूट पटकावला. बेंगळुरूचा चिरंत विश्वनाथ आणि सॅव्हियन साबू यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसरे स्थान मिळवले.
याआधी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप’ या श्रेणीमध्ये मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ’ करून दाखविला होता.
मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षीय सार्थक चव्हाणने धडाकेबाज कामगिरी करत ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी’ गटाचे विजेतेपद पटकावले. पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग संघाकडून सहभागी झालेल्या सार्थकने शेवटच्या फेरीत धाडसी चाली करत नाट्यमय विजय मिळविला. १६ ऑगस्टला झालेल्या सहा फेऱ्यांच्या शर्यतीत सार्थक बहुतांश वेळ तिसऱ्या स्थानावर होता. त्याच्यासमोर बंगळुरूचा सहकारी चिरंत विश्वनाथ आणि हैदराबादचा राहिल पिल्लारीसेट्टी होते. अखेरच्या फेरीत सार्थकने दोघांनाही मागे टाकत आघाडी घेतली.