सार्थक चव्हाण विजेतेपदाचा दावेदार
स्पर्धेच्या मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ’ करून दाखविला. आता इंडोनेशियामध्ये चौथ्या फेरीसाठी सार्थक सज्ज झाला आहे.
लढतीआधी बोलताना सार्थक म्हणाला की, दुसऱ्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. तिसऱ्या फेरीत सहभागी झालो नाही कारण मी स्पेनमध्ये आणि फ्रान्स्मध्ये झालेल्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद शर्यतीमध्ये सहभागी होतो. आता मला पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करायची आहे पण, त्याचे मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. थायलंडमधील माझ्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.एम. आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक शशांक गुप्ता आणि मेहुल छेडा यांनी या रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. ‘पुणे कार्टड्रोम’ येथे सार्थक आपल्या शर्यतीसाठीचा सराव करतो. तसेच सार्थक साई जीमचे चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिटनेस’ सराव करत आहे. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.






