सार्थक चव्हाण (फोटो- सोशल मिडिया)
टर्न-२ येथे रक्षित दवे आणि सॅव्हियन साबू यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. या विजयामुळे सार्थकने पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग संघाला स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.सार्थकने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिपच्या टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप श्रेणीतील मलेशिया येथे झालेल्या पहिल्या फेरीत त्याने पोडियम मिळविले होते. त्यानंतर मे महिन्यात थायलंडमधील बुरिराम येथील चांग इंटरनॅशनल सर्किटवरील दुसऱ्या फेरीत तो विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरला होता.
स्पेनमधील सर्किटो डी जेरेझ-अँजेल निएटो येथे झालेल्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या शर्यतीत सार्थकने सहावा क्रमांक मिळविला. जीपीस्टॉक युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम गुणतालिकेत पहिल्या सहामध्ये स्थान मिळविणारा तो पहिला भारतीय रेसिंगपटू ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात नवा विक्रम नोंदविला गेला.
निकाल
सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी, शर्यत एक :
१. सार्थक चव्हाण, पुणे, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग – ११ मिनिटे ०१.९७१ सेकंद
२. चिरंत विश्वनाथ, बेंगळुरू, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग – ११ मिनिटे ०२.२६४ सेकंद
३. राहिल पिल्लारीसेट्टी, हैदराबाद, आरएसीआर कॅस्ट्रॉल पॉवर१ – ११ मिनिटे ०२.६०९ सेकंद






