Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?

मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 09:42 PM
sarthak chvhan

sarthak chvhan

Follow Us
Follow Us:
  • सार्थक चव्हाण विजेतेपदाचा दावेदार
  • इंडोनेशियामध्ये होणारीएशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप
  • महाराष्ट्रातून सहभागी होणारा पुण्यातील एकमेव रेसिंगपटू
पुणे: इंडोनेशियामध्ये होणाऱ्या एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाचा सार्थक चव्हाण मौसमातील दुसऱ्या फेरीच्या रेसमध्ये विजेतेपदाचा दावेदार समजला जात आहे. थायलंमधील दुसऱ्या फेरीत सार्थकने विजेतेपदाला गवणसी घातली होती. स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता. हि चौथी फेरी रविवार, ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

स्पर्धेच्या मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता‌’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट‌’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ‌’ करून दाखविला. आता इंडोनेशियामध्ये चौथ्या फेरीसाठी सार्थक सज्ज झाला आहे.

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य

लढतीआधी बोलताना सार्थक म्हणाला की, दुसऱ्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. तिसऱ्या फेरीत सहभागी झालो नाही कारण मी स्पेनमध्ये आणि फ्रान्स्‌मध्ये झालेल्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद शर्यतीमध्ये सहभागी होतो. आता मला पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करायची आहे पण, त्याचे मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. थायलंडमधील माझ्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

क्रिकेटविश्वात प्रचंड मोठी खळबळ! Pakistan विरुद्ध खेळण्यास ‘या’ खेळाडूचा स्पष्ट नकार; हेड कोच म्हणाले…

डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.एम. आणि प्लनेट डीएसजी यांनी सार्थकला पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहे. पुण्यातील उद्योजक शशांक गुप्ता आणि मेहुल छेडा यांनी या रेससाठी सार्थकला पाठींबा दिला आहे. ‘पुणे कार्टड्रोम’ येथे सार्थक आपल्या शर्यतीसाठीचा सराव करतो. तसेच सार्थक साई जीमचे चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिटनेस‌’ सराव करत आहे. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Web Title: Sarthak chavan is a title contender for the asia road racing championship in indonesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • Indonesia
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
4

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.