Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

बीसीबीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंझुरुल इस्लाम याला बांगलादेश क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही भूमिकेसाठी कायमचे 'ब्लॅकलिस्ट' करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 23, 2026 | 07:08 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप (Photo Credit- X)

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट विश्वात खळबळ!
  • वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप
  • माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई
Bangladesh Cricket Sexual Harassment: क्रिकेट क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्याच माजी मुख्य निवडकर्त्यावर मोठी कारवाई केली आहे. माजी महिला कर्णधार जहाआरा आलम (Jahanara Alam) हिने लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची दखल घेत बोर्डाने माजी वेगवान गोलंदाज आणि माजी मुख्य निवडकर्ता मंझुरुल इस्लाम (Monjurul Islam) याच्यावर क्रिकेटशी संबंधित सर्व उपक्रमांत सहभागी होण्यास आजीवन बंदी घातली आहे.

BCB ची कठोर भूमिका; इस्लाम ‘ब्लॅकलिस्टेड’

रविवारी ढाका येथे पार पडलेल्या बीसीबीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंझुरुल इस्लाम याला बांगलादेश क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही भूमिकेसाठी कायमचे ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात आले आहे. २०२० मध्ये त्याची बांगलादेश महिला संघाच्या मुख्य निवडकर्ता पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, जहाआरा आलमच्या तक्रारीनंतर स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये इस्लामवर ठपका ठेवण्यात आला आहे.

Bangladesh take big step over sexual harassment allegations by ex-women’s cricket team skipper Jahanara Alam#Bangladesh https://t.co/gtUSHKOlGw — CricketNDTV (@CricketNDTV) February 23, 2026

T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला थेट इशारा, जाणून घ्या काय म्हणाला…

नेमके आरोप काय होते?

जहाआरा आलमने एका मुलाखतीत मंझुरुल इस्लामच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला होता. तिच्या आरोपांनुसार मंझुरुल इस्लाम परवानगीशिवाय खांद्यावर हात ठेवत असे. तो तिच्या मासिक पाळीबद्दल (Periods) प्रश्न विचारून तिला मानसिक त्रास देत असे. हस्तांदोलन करण्याऐवजी तो संघसहकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करायचा. जहाआराने त्याचे अयोग्य प्रस्ताव फेटाळल्यामुळे त्याने तिचे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप तिने केला आहे.

बोर्डाकडून आणखी कारवाईचे संकेत

बीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “स्वतंत्र चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारावर मंझुरुल इस्लामला कोणत्याही क्रिकेटशी संबंधित उपक्रमातून प्रतिबंधित करण्यात आले आहे. बोर्ड समितीच्या शिफारशींचे अधिक सखोल पुनरावलोकन करत असून, गरज भासल्यास भविष्यात त्याच्यावर अधिक कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.”

जहाआरा आलमची कारकीर्द

जहाआरा आलम ही बांगलादेश महिला क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहे. तिने ५२ एकदिवसीय सामन्यांत ४८ विकेट्स आणि ८३ टी-२० सामन्यांत ६० विकेट्स घेतल्या आहेत. या प्रकरणामुळे बांगलादेश क्रिकेटमधील अंतर्गत व्यवस्था आणि महिला खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mahika Sharma Troll: पांड्या बाद झाला अन् माहिका शर्माने वाजवल्या टाळ्या! Video व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तुफान केले ट्रोल

Web Title: Sexual harassment allegations against fast bowler board takes major action after complaint from former women captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Board
  • cricket news
  • Sexual Assault

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
2

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
3

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
4

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.