भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सरचिटणीस देवजीत सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
१९ व्या हंगामाच्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजूरला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात विकला गेलेला तो एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. मुस्तफिजूरवर झालेल्या गदारोळानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले मौन सोडले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संदर्भात एक आणखी अपडेट समोर आली आहे. डिसेंबरमध्ये श्रीलंकेसोबत होणाऱ्या ट्राय सिरीज टी-२० मालिकेत सहभागी होण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेले निमंत्रण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाकारले.